WEST BENGAL BJP SUSPENDS 22 LEADERS OVER EXTORTION ALLEGATIONS | LATEST POLITICAL NEWS Saam tv
देश विदेश

Breaking News : खंडणीप्रकरणी भाजपच्या २२ नेत्यांचे निलंबन, राजकारणात खळबळ

West Bengal BJP Political Update News : पश्चिम बंगालमध्ये भाजपने खंडणी, 'कट मनी' आणि पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांवर २२ पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. २५० हून अधिक जणांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • पश्चिम बंगाल भाजपने खंडणीच्या आरोपांवर २२ पदाधिकाऱ्यांना निलंबित केले

  • या प्रकरणात २५० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीस

  • सुमारे ८० जणांची स्पष्टीकरणे समाधानकारक आढळल्याने त्यांच्यावर कारवाई टाळण्यात आली

पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच पक्षासमोर मोठे संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकाळात वारंवार चर्चेत असलेले खंडणी आणि 'कट मनी'चे आरोप आता भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवरही होत असल्याने पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने कठोर भूमिका घेत २२ पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकारी आहेत. त्यांच्यावर खंडणी मागणे, तृणमूल काँग्रेसची कार्यालये बळकावण्याचा प्रयत्न करणे, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी अनुचित संबंध ठेवणे आणि पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी पश्चिम बंगालमधून २५० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

चौकशीदरम्यान सुमारे ८० पदाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण समाधानकारक आढळल्याने त्यांच्यावरील कारवाई टाळण्यात आली. मात्र, अनेकांची उत्तरे असमाधानकारक ठरल्याने २२ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनीही पक्षाच्या नावाखाली होत असलेल्या कथित खंडणीखोरीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. त्यांनी अशा प्रकारांना कोणतीही माफी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करत संबंधितांना १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.

ठरलेल्या वेळेत सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. या कारवाईमुळे पक्षात शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी सरकारसमोर पारदर्शक प्रशासनाची प्रतिमा टिकवण्याचे मोठे आव्हान कायम असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.दरम्यान आता २२ नेत्यांच्या निलंबनानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कंगना-क्रितीच्या वादात राहुल गांधींची उडी; क्रिती सॅननच्या जाहिरातीनं राजकारण तापलं

Firing On Singer: जिमबाहेर घात लावून बसले, बाहेर येताच गायकावर झाडल्या धाडधाड २० गोळ्या

Video : दहाव्या मजल्यावरुन महिला पडली, झाडामुळे बचावली, रेस्क्यू ऑपरेशन

Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; निष्ठावंत नेत्याचा राजीनामा,४ माजी नगरसेवकांसह शिवसेनेत करणार प्रवेश

Tukaram Munde Action : तुकाराम मुंढेंच्या रडारवर अंगणवाड्या! निकृष्ट पोषण आहाराची तपासणी

SCROLL FOR NEXT