BJP MLA Rekha Patra hospitalised after suspected pesticide poisoning 
देश विदेश

भाजपच्या महिला आमदाराला विषबाधा; व्हेंटिलेटरवर उपचार, प्रकृती चिंताजनक

BJP MLA Rekha Patra Hospitalised : भाजपच्या महिला आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधेची शक्यता असल्याने, कोलकातामधील एका रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

Bharat Jadhav

  • ऑर्गनोफॉस्फरस आधारित कीटकनाशकामुळे विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती

  • हिंगलगंजच्या भाजप आमदार रेखा पात्रा यांची प्रकृती खालावली

  • रेखा पात्रा यांच्यावर आर एन टागोर रुग्णालयात उपचार

पश्चिम बंगालमधील हिंगलगंज मतदारसंघातील भाजपच्या महिला आमदार रेखा पात्र यांची प्रकृती चिंताजनक आहे. रेखा पात्रा यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. प्राथमिक माहितीनुसार आमदार रेखा पात्रा यांना विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुकुंदपूर येथील आर. एन. टागोर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या हिंगलगंज विधानसभा मतदारसंघातून त्या 2024 च्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.

रेखा पात्रा यांना ऑर्गनोफॉस्फरस आधारित कीटकनाशकाची विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. आरोग्यमंत्री शरद्वत मुखोपाध्याय यांनी रुग्णालयात जाऊन रेखा पात्र यांच्या प्रकृतीची विचारपूस केलीय. रेखा यांची काल त्यांच्या निवासस्थानी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं.

उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हिंगलगंज मतदारसंघाच्या आमदार असलेल्या रेखा पात्र यांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात घेत त्यांना बशीरहाट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. आता त्यांना पुढील उपचारांसाठी कोलकात्यातील मुकुंदपूर येथील आर. एन. टागोर या खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आणण्यात आलं.

दरम्यान, आमदार रेखा शनिवारी रात्री 9 वाजता हिंगलगंज येथील निवासस्थानी अचानक आजारी पडल्या, मात्र त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक होऊ लागल्याने त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेखा पात्रा यांना विषबाधा झाल्याची अधिकृत माहिती भापजा किंवा रुग्णालयाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे, त्यांच्या आजाराचे नक्की कारण अद्याप समोर आलं नाहीये. पात्रा यांनी पश्चिम बंगालमधील तत्कालीन तृणमूल काँग्रेस सरकारवर महिलाविरुद्ध हिंसा आणि अत्याचाराचे आरोप करत जोरदार आंदोलन केले होते. आंदोलनातील त्यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांची दखल घेण्यात आली होती. त्यातूनच, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना संधी दिली आणि त्या आमदार बनल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॅन्सरग्रस्तांसाठी आशेचा नवा किरण; कॅन्सरला हरवणं शक्य, क्लिनिकल ट्रायलमध्ये शास्त्रज्ञांना मोठं यश

कारवाईनंतरही पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा; पुणे मनपा आयुक्तांचा व्यापाऱ्यांना कठोर इशारा

Fact Check: सचिन तेंडुलकरची लेक लवकरच होणार देओल कुटुंबाची सून? सनी देओलच्या मुलासोबत जोडलं नाव

Monday Horoscope: आज या राशींचे नशीब चमकणार! कोणाला मिळणार आनंदाची बातमी, तर कोणाला करावा लागणार खर्च?

Hyderabad Terror Threat: 26/11 सारख्या हल्ल्याचा कट,300 जण टार्गेटवर; धमकीच्या पत्राने हैदराबाद हादरलं! पोलिसांचा हाय अलर्ट

SCROLL FOR NEXT