Weekend Curfew In Delhi Saam Tv
देश विदेश

Delhi Curfew: दिल्लीत वीकेंड कर्फ्यू, दुकानांवरील निर्बंध हटणार!

दिल्लीत (Delhi) कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीतील निर्बंध कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

वृत्तसंस्था

दिल्ली : दिल्लीत सरकारने (Delhi Government) वीकेंड कर्फ्यू हटवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यासोबतच बाजारातील दुकाने उघडण्यासाठी लागू असलेली सम-विषम प्रणालीही बंद करण्यात येणार आहे. यासोबतच खासगी कार्यालयेही (Private Offices) 50% कर्मचाऱ्यांसह पुन्हा सुरू करता येणार आहेत. कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. सध्या त्यांनी हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी नायब राज्यपाल अनिल बैजल (Anil Baijal) यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. (Weekend Curfew In Delhi)

दिल्लीमध्ये कोरोनाची केसेस वाढल्याने अनेक निर्बंध लावण्यात आले होते. यात वीकेंड कर्फ्यू, दुकानांसाठी सम-विषम प्रणालीचाही (Odd-Even System) समावेश होता. खाजगी कार्यालये पूर्णपणे बंद करून WFH लागू करण्यात आला होता. मात्र यामुळे दुकानांसाठी लागू करण्यात आलेल्या सम-विषम प्रणालीला मोठा विरोध झाला होता. (Delhi Latest News Updates)

हे देखील पहा-

दिल्लीतील कोरोना आकडेवारी काय म्हणते?

सध्या दिल्लीत कोविड रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे मात्र, देशातील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 3,47,254 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 703 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू (Death) झाला आहे. कालच्या तुलनेत कोरोना रुग्णांची ही संख्या सुमारे 30 हजारांनी अधिक आहे. याशिवाय अनेक महिन्यांनंतर 700 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शिवाय, काल राजधानी दिल्लीत 12306 कोरोना रुग्ण आढळले आणि 46 जणांनी आपला जीव गमवावा. म्हणजेच दिल्लीतही केसेस कमी झाल्या असतील पण मृतांचा वाढता आकडा चिंतेचा विषय आहे. काल 10 जूननंतर 1 दिवसात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. 10 जून रोजी 44 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या दिल्लीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 68,730 आहे. तसेच दिल्लीमध्ये कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 25,503 वर पोहोचली आहे. याशिवाय 53,593 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये (Home Quarantine) आहेत.

सध्या दिल्लीत संसर्गाचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाले आहे आणि यामुळेच दिल्ली सरकारने आधीच सांगितले होते की, कोविड स्थिती जर नियंत्रणात आली तर, निर्बंध हटवले जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

SCROLL FOR NEXT