IMD Unseasonal Rain Alert Saam TV
देश विदेश

Heavy Rain Alert : महाराष्ट्रासह 22 राज्यांना आज अतिमुसळधार पावसाचा इशारा; वाचा कुठे कुठे कोसळणार पाऊस

Rain News Today Marathi : आयएमडीने महाराष्ट्रासह तब्बल 22 राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही भागात पावसाचा ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

Satish Daud

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण देशाला पावसाने झोडपून काढलं. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप हंगामातील शेतीपिकांना मोठा दिलासा मिळाला. आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून बळीराजाने शेतीकामांना वेग दिलाय. अशातच भारतीय हवामान खात्याने आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आयएमडीने महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) तब्बल 22 राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही भागात पावसाचा ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. आयएमडीच्या मते, आज हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

याशिवाय जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये पंजाब, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, गोवा, मुंबई, मध्य महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू, केरळ आणि आसामसह सर्व सात ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आलाय.

भारतीय हवामान विभागाने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून देशात मान्सूनच्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेश, दक्षिण झारखंड आणि लगतच्या भागात खालच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रात चक्री वारे वाहत आहेत. ईशान्य राजस्थान आणि आसपासच्या भागातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

याचा मोठा परिणाम वातावरणावर झाला असून गेल्या 24 तासांत तामिळनाडू, पुद्दुचेरी, हिमाचल प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, मेघालय येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याच वेळी, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातील काही भागांना देखील पावसाने झोडपून काढलंय.

दुसरीकडे पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, बिहार, झारखंड, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, कोकण आणि गोवा, मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. महाराष्ट्र, रायलसीमा पावसाची नोंद झाली आहे. अशातच आज पुन्हा महाराष्ट्रासह अनेक राज्यांना हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT