Heavy Rain Alert Today in Maharashtra Saam TV
देश विदेश

Rain Alert : कच्छच्या आखातात धोकादायक चक्रीवादळ; महाराष्ट्रासह ११ राज्यांना आज पावसाचा अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

Satish Daud

सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु असून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाने अक्षरश: कहर केला आहे. आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरु असल्याने नद्या-नाल्यांना मोठा पूर आलाय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, आजही काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

कच्छच्या आखात आणि पूर्व मध्य प्रदेशाजवळ एक धोकादायक चक्री चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे आज सोमवारीही अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारतातील राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणा इत्यादी राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

त्याचवेळी दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, आसाम आणि मणिपूर या दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये सोमवारी मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि त्यांच्या आसपासच्या भागांसारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे तेथून उगम पावणाऱ्या नद्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये पुराचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 56 वर्षात पहिल्यांदाच कोसी बॅरेजवरून पाणी वाहत आहे. सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा

हवामान खात्याने आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : 'लाडकी बहीण'वरून गडकारींचा सरकारला घरचा आहेर; केलं मोठं विधान !

Maharashtra News Live Updates : मणिपूरमधील नागरिकांनी घेतली शरद पवारांची भेट

Krushna Abhishek Net Worth: आलिशान घर ते लग्झरी गाड्या, कपिल शर्माला ही टक्कर देत आहे 'हा' कॉमेडियन कलाकार; जाणून घ्या संपत्तीचा आकडा किती?

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात तुफान राडा, कोकण हार्टेड गर्ल अभिजीतवर संतापली; नेमकी कोणी टाकली ठिणगी?

Devra Movie: 'देवरा पार्ट १' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घसरगुंडी; तिसऱ्या दिवशी केली इतक्याच कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT