Weather Update 31 January 2024 Saam TV
देश विदेश

Weather Alert: देशातील अनेक राज्यांवर अवकाळी पावसाचं संकट; महाराष्ट्रात कसं असेल हवामान? वाचा वेदर रिपोर्ट...

IMD Rain Alert News: वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे वातावरणात मोठा बदला झाला असून अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Satish Daud

Weather Update 31 January 2024

डोंगराळ भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीसह एनसीआर उत्तरप्रदेश आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा वाढला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. मागील आठवड्यापासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डोंगराळ भागात बर्फवृष्टीचे प्रमाण वाढणार असून काही भागात पाऊस देखील कोसळण्याची शक्यता आहे. IMD च्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे येत्या २४ तासांत जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील काही भागात मुसळधार पावसासह (Heavy Rain Alert) हिमवृष्टीची शक्यता आहे.

हवामान खात्याने एका निवेदनात म्हटले आहे की, ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.  (Latest Marathi News)

दुसरीकडे उत्तर भारतातून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे महाराष्ट्रातही कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये फेब्रुवारीच्यासुरुवातीला तापमान हे १० डिग्रीच्या खाली जाऊ शकते. पुणे, नाशिक, जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा आणखीच घसरण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा अमरावती, अकोला भागातील तापमानात घट होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईत तीन ते चार दिवसांत गुलाबी थंडीचा अंदाज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies: काळेभोर आणि दाट केसांसाठी एकदा ट्राय करा 'हे' उपाय

Onion Crop : धुक्यामुळे कांदा पिक धोक्यात; रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Sneeze: शिंकताना डोळे का बंद होतात? जाणून घ्या एका क्लिकवर

Crime News : ३-३ गर्लफ्रेंड, महागडं गिफ्ट द्यायचं होतं; पठ्ठ्या थेट बँक लुटायला गेला, पण सगळा घोळ झाला!

SCROLL FOR NEXT