Maharashtra Rain Alert  SAAM TV
देश विदेश

Weather Alert : सावधान! आजपासून पुढील ७ दिवस मुसळधार पाऊस, देशातील 24 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा; IMD अलर्ट

Rain News Today : आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढील 7 दिवस देशातील 24 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे.

Satish Daud

श्रावण महिना सुरु होताच देशातील वातावरणात मोठे बदल झाले आहेत. अनेक राज्यांमध्ये सध्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहेत. पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. खरीप हंमातील पिके बहारल्याने शेतकरी देखील सुखावला आहे. अशातच हवामान खात्याने पुढील आठवडाभर पावसाचा इशारा दिला आहे.

आयएमडीने (IMD Rain Alert) जारी केलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढील 7 दिवस देशातील 24 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त छत्तीसगड, गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश आणि सर्व सात ईशान्येकडील राज्यांमध्ये या काळात मुसळधार पाऊस पडू शकतो. सध्या राजस्थान आणि दक्षिण झारखंड आणि शेजारील भागात कमी दाबाच्या क्षेत्राच्या अगदी वर चक्रीवादळ वाऱ्यांचा प्रवाह आहे.

त्याच्या प्रभावामुळे 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. सध्या हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला आहे. ढगफुटीसदृश्य पावसाने आतापर्यंत 28 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. अजूनही 30 हून अधिक नागरिक बेपत्ता आहे.

महाराष्ट्रात कुठे-कुठे कोसळणार पाऊस?

महाराष्ट्रातही आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीडला देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर घाट माथ्यात तीव्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही भागात 30 ते 40 किमी/ताशी वेगाने वारे वाहणाऱ्या संभाव्य वादळाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT