सुप्रीम मस्कर, साम टिव्ही
दोन आठवड्यापासून सुरु असणाऱ्या इस्रायल-इराण संघर्षात अखेर अमेरिकेनं उडी घेतलीय. अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर बी 2 बॉम्बर्सनं हल्ला केलाय. यात इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या तीन ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले करण्यात आलेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिलीय.
अमेरिकेचा इराणवर हल्ला
आम्ही इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फहान या तीन अणुऊर्जा केंद्रांवर यशस्वी हल्ला केलाय. सर्व विमाने आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत.फोर्डो या अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा पूर्ण पेलोड टाकण्यात आलाय. सर्व विमाने सुरक्षितपणे अमेरिकेत परतलेत. या यशस्वी कामगिरीसाठी अमेरिकन लष्कराचं अभिनंदन. जगात दुसरे कोणतेही सैन्य हे करू शकलं नसतं. त्यामुळे आता शांततेची वेळ आलीय. इराणविरोधात थेट मैदानावर उतरण्याआधी अमेरिकेनं गेल्या आठवड्याभरापासून कशा पद्धतीनं रणनिती आखली होती.
अमेरिकेची रणनीती?
16 जून
मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांवर सुरक्षा वाढवली
G7 देशांकडून इस्रायलच्या हल्ल्याचे समर्थन
17 जून
ट्रम्पचं खोमेनींना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन
18 जून
आत्मसमर्पण करण्यास नकार देत खोमेनींचा अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा
19 जून
युद्धात उतरण्याबाबत अमेरिकेकडून 2 आठवड्यांचा कालावधी निश्चित
21 जून
मध्यरात्री अमेरिकेकडून इराणच्या तीन अणुप्रकल्पांवर हल्ला
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याची तुलना 1945 च्या अणुहल्ल्याशी केली जातेय. त्यामुळे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इराणमधील अणुप्रकल्पावरील हल्ल्याला भयानक हल्ला म्हटलयं. तर युद्ध तुम्ही सुरू केलं, पण शेवट आम्ही करू, अशी उघडपणे धमकी इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून अमेरिकेला देण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमचा सदस्य असलेल्या अमेरिकेने इराणच्या शांततापूर्ण अणुप्रकल्पांवर हल्ला करून संयुक्त राष्ट्रांच्या सनद, आंतरराष्ट्रीय कायदा आणि एनपीटीचे गंभीर उल्लंघन केले आहे. त्यांनी केलेला हल्ला अत्यंत घृणास्पद आहे. या घटनेचे गंभीर परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील.
इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत असल्याच्या संशयातून इस्त्राईलने इराणवर हल्ला केला आणि युद्धाला तोंड फोडलं.. आतापर्यंत इस्त्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणमधील 400 नागरिकांचा मृत्यू झालाय. त्यात 54 महिलांचा आणि लहान मुलांचाही समावेश होता. तर जखमींची संख्या 3 हजारांवर पोहचलीय. इराण-इस्रायलच्या युध्दात उतरून अमेरिकेने इराणला डिवचंल आहे. त्यामुळे संतापलेला इराण आता अमेरिकेच्या एअर बेसवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचंही शक्यता वर्तवली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.