Iran-Israel War: इराण चवताळला; होर्मुझ स्ट्रेट बंद करण्याचा घेतला निर्णय, कच्चे तेलाच्या किमतींचा भडका उडणार

Strait of Hormuz Closed: इराणच्या संसदेने होर्मुझ जलमार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान याबाबतचा अंतिम निर्णय सर्वोच्च नेते खामेनी घेतील.
Iran-Israel War
Strait of Hormuz Closed
Published On

इस्रायलशी युद्ध आणि अमेरिकेच्या हल्ल्यादरम्यान इराण एक मोठे पाऊल उचलणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, होर्मुझ मार्ग बंद करण्याचा प्रस्ताव इराणी संसदेत मंजूर करण्यात आलाय. रविवारी यावर मतदान घेण्यात आले. दरम्यान यावर अंतिम निर्णय सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषद घेईल. या जलमार्गातून जगातील सुमारे २६ टक्के तेल व्यापार होतो. जर हा मार्ग बंद करण्याचा निर्णय पास झाला तर कच्चे तेलाच्या किमती वाढतील. यामुळे भारतीय बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम होणार आहे.

Iran-Israel War
Iran Israel Conflict Effect : इराण-इस्रायलच्या युद्धाचा फटका; भारतात काय काय महागणार? जाणून घ्या

होर्मुझची जलमार्ग पर्शियन आखाताला अरबी समुद्र आणि हिंद महासागराशी जोडते. हा ३३ किलोमीटर रुंद मार्ग आहे ज्यावर इराणचा अधिकार आहे. या जलमार्गातील शिपिंग लेन फक्त ३ किलोमीटर रुंद आहे. अशा परिस्थितीत, हा मार्ग जगासाठी खूप महत्त्वाचा बनतो. आखाती देशांचा बहुतेक तेल पुरवठा याच मार्गाने होतो.

Iran-Israel War
Israel Iran War: अणूबॉम्ब नव्हे, इराणवर हल्ला करण्यामागे अमेरिकेचा वेगळाच हेतू; धक्कादायक कारण आलं समोर

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, या आखातातून दररोज आयात होणाऱ्या ५.५ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलापैकी, भारतासाठी दररोज सुमारे २० दशलक्ष बॅरल कच्चे तेल या जलमार्गातून जाते. हा मार्ग बंद पडल्याने याचा थेट भारतावर परिणाम होईल आणि देशातील कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात.

खासदार आणि रिव्होल्यूशनरी गार्ड कमांडर इस्माईल कोसारी म्हणाले की यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हा जलमार्ग बंद करणं हे आमच्या अजेंड्यामध्ये आहे. गरज पडल्यास हा मार्ग बंद केला जाईल. जर इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनेही होर्मुझ हा मार्ग बंद करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली, तर संपूर्ण जगात खळबळ माजेल. दरम्यान जर अमेरिकाही या युद्धात इस्रायलमध्ये सामील झाला तर होर्मुझ मार्ग बंद होऊ शकते , असं इराणी खासदार यझदीखा यांनी आधीच सांगितले होते.

होर्मुझची जलमार्ग बंद करणे हे जागतिक संकटाला आमंत्रण देण्यासारखे ठरणार आहे. कारण हा शिपिंग मार्ग सुमारे ९६ मैल लांब आहे. जर इराणने असे पाऊल उचलले तर कच्च्या तेलाच्या किमती वाढतील. दरम्यान त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील आणि जगाचा एक मोठा भाग महागाईने त्रस्त होईल. होर्मुझची हा एक सागरी मार्ग आहे जो पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडतो.

हा जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे, कारण जागतिक तेलाचा मोठा भाग या मार्गाने वाहतूक केला जातो. जर हा मार्ग बंद झाला तर त्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर खोलवर परिणाम होईल आणि त्यामुळे जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर चिंतेचं वातावरण निर्माण होईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा मार्ग भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्या ९०% कच्च्या तेलाच्या आणि सुमारे ५०% नैसर्गिक वायूच्या आयाती याच मार्गाने होतात. विशेषतः इराक आणि सौदी अरेबियामधून येणारे तेल या मार्गावर अवलंबून असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com