vvpat slip :  Saam tv
देश विदेश

व्हीव्हीपॅट पावत्यांचा रस्त्याच्या कडेला ढीग; दोन अधिकारी निलंबित, आयोगाकडूनही स्पष्टीकरण

vvpat slip : व्हीव्हीपॅट पावत्यांचा रस्त्याच्या कडेला ढीग आढळला आहे. या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी लगबग सुरु

एका विधानसभा मतदारसंघात सापडल्या व्हीव्हीपॅटच्या पावत्या

दोन अधिकारी निलंबित, कारवाई सुरु

बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालीये. आता राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून दुसऱ्या टप्प्यासाठी लगबग सुरु झाली आहे. या दुसऱ्या टप्प्यादरम्यान बिहारच्या समस्तीपूरमधील एका विधानसभा मतदारसंघात व्हीव्हीपॅटच्या पावत्या सापडल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने या पावत्या जप्त केल्या आहेत. या प्रकरानंतर निवडणूक आयोगाने संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करत चौकशीचे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देताना म्हटलं की, 'मॉक पोलमधील व्हीव्हीपॅट पावत्या असल्याने आमच्याकडून मतदानाची शुद्धता राखली जात आहे. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनाही माहिती दिली होती. आम्ही संबंधित एआरओला निष्काळजीपणाबद्दल निलंबित केलं आहे. एफआयआर देखील नोंदवला जात आहे'.

समस्तीपूरचे जिल्हा दंडाधिकारी रोशन कुशवाह यांनी म्हटलं की, आम्हाला एका विधानसभा मतदारसंघात व्हीव्हीपॅटच्या पावत्या सापडल्या. त्यानंतर आम्ही तातडीने इतर अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचलो. त्या पावत्या जप्त केल्या आहेत. आता या प्रकरणात एफआयआर देखील नोंदवला जात आहे. आम्ही या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवणार्‍या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी आणि निलंबनाची शिफारस केली आहे.'

जिल्हा दंडधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, 'या पावत्या कोणत्या काळातील होत्या, हे चौकशीतून समोर येईल. या प्रकरणाच्या माध्यामातून कोणतीही अफवा पसरवू नये. चौकशीनंतर सत्य समोर येईल'.

सरायरंजन विधानसभा मतदारसंघातील शीतलपट्टी गावात हजारो व्हीव्हीपॅटच्या पावत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या पावत्या डिस्पॅच सेंटर जवळ सापडल्या आहेत. या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पुढे स्पष्ट केलं की, मतदान यंत्रे सुरु करताना ५ टक्के यंत्रावर १००० मतांचा मॉक पोल घेतला जातो. सर्व उमेदवारांच्या चिन्हांवर लोडिंग पडताळण्यासाठी बटण प्रेस चाचणी घेतली जाते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

SCROLL FOR NEXT