Banke Bihari Temple Viral Video x
देश विदेश

Banke Bihari Temple : मंदिरात तुफान राडा, महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हाणामारी; Video Viral

Video : मथुरेच्या वृंदावन शहरातील बांके बिहारी मंदिरामध्ये महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

  • वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हाणामारी झाली.

  • महिलेला मारहाण व शिवीगाळ झाल्याचा आरोप, तर भाविकांकडून गैरवर्तन झाल्याचे रक्षकांचे म्हणणे.

  • या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vrindavan Banke Bihari Temple : मथुरेतील वृंदावन शहरातील बांके बिहारी मंदिरामध्ये हाणामारी झाली. दर्शनासाठी दिल्लीहून आलेले भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये जुंपली. या हाणामारीमध्ये एका महिलेसह दोन भाविक जखमी झाले. सुरक्षा रक्षकांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. भाविकांनी असभ्य वर्तन केल्याचे सुरक्षा रक्षकांनी म्हटले आहे. या हाणामारीची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या शालीमार गार्डन येथील रहिवासी अशोक सभलोक सोमवारी (८ सप्टेंबर) दुपारी आपल्या कुटुंबासह बांके बिहारी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. दर्शनासाठी जात असताना सुरक्षा रक्षक राकेश आणि महेश चंद्र यांनी भाविकांना पुढे जाण्यास सांगितले. याचा राग अशोक सभलोक यांना आला. त्यानंतर मंदिराचे सुरक्षा रक्षक आणि अशोक सभलोक यांचे कुटुंबीय यांच्या वाद सुरु झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाली.

अशोक यांची पत्नी रेणू यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. आम्ही बांके बिहारी लाल यांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. काळ्या कपड्यांमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि तिथे उपस्थित असलेल्या काही पोलिसांनी धक्काबुक्की केली. आम्हाला शिवीगाळ केली, केस ओढले आणि खाली फेकले. सभलोक यांनी या प्रकरणी वृंदावन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दुसऱ्या बाजूला, बांके बिहारी मंदिराचे प्रभारी खासगी सुरक्षा रक्षक अटल बाबू यांनी सुरक्षा रक्षकांची बाजू मांडली. सुरक्षा रक्षक भाविकांना पुढे जाण्यासाठी सांगत होते. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. भाविकांनी सुरक्षा रक्षकांशी गैरवर्तन केले, मारहाण केली. या प्रकरणी आम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, असे अटल बाबू यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Vanga Prediction: दोन महिन्यात भारतात महापूर,भूस्खलन व तापमान वाढ; कोणी दिला इशारा?

Konkan Mhada House : म्हाडाच्या घरांसाठी अर्जांचा पाऊस; सानपाड्यातील २ घरांसाठी तब्बल ६१५६ अर्ज, प्राइम लोकेशन आहे तरी कुठं?

Gautam Patil : गौतमी पाटीलला अटक होणार? 'ते' प्रकरण अंगलट येणार, नेमकं काय घडलं होतं?

Maharashtra Politics: आता उद्धव ठाकरेंचं मिशन मराठवाडा, शेतकऱ्यांसाठी ठाकरे रस्त्यावर उतरणार?

Mumbai Crime: आरे कॉलनीत डान्सरवर बलात्कार; सराव करताना नृत्य प्रशिक्षकाची नियत फिरली, दारू पाजली नंतर...

SCROLL FOR NEXT