Rising US–Iran tension  Saam Tv
देश विदेश

US Iran War : युद्धामुळे जगावर कोरोनासारखं संकट, संपूर्ण जग ठप्प होणार? पुतीन यांचा गंभीर इशारा

Rising US–Iran tension Latest News : मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक संकट गडद होत असल्याचा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे. इंधन टंचाई, पुरवठा साखळी विस्कळीत होणे आणि महागाई वाढ यामुळे कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Iran Israel war latest updates : मध्य पूर्वेतील युद्धामुळे इंधन टंचाई निर्माण होऊन जग वेठीस धरलं आहे. इराण-इस्त्राईल अमेरीका युद्धाला एक महिना होत आलाय. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आखातीमधील युद्धाबाबत गंभीर इशारा दिला आहे. पाहूया एक खास रिपोर्ट.

आखाती देशातील युद्धामुळे जगाला गंभीर परीणामांना तोंड द्यावं लागतंय. गॅस, इंधनाच्या टंचाईची झळ सर्वसामान्यांना बसू लागलीये. लॉकडाऊनची भिती व्यक्त होतेय. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मध्य पूर्वेतील युद्धाबाबत गंभीर इशारा दिला आहे. पुतिन यांनी मॉस्कोमध्ये उद्योजकांशी संवाद साधताना मध्य-पूर्वेतील युद्धावर चिंता व्यक्त केली आहे. "या युद्धाचे परिणाम किती खोलवर होतील, हे सांगणे सध्या कठीण आहे, मात्र काही अंदाजांनुसार या युद्धामुळे जागतिक स्तरावर कोविडच्या काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते', असा इशारा त्यांनी दिलाय.

जागतिक प्रश्न निर्माण झालेत. आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स, पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. इंधन उत्पादन आणि तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर परीणाम झाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था संकटात आहे. त्यामुळे कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते,.

इराण-इस्त्राईल अमेरीका युद्धाला एक महिना होत आलाय. मात्र शांततेच्या दृष्टीने ठोस पाऊलं उचलली जात नाहीत. इस्त्राईल लेबनॉनवर सातत्याने हल्ले करत आहेत. दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्ध दिर्घकाळापासून सुरु आहे. युक्रेनने नुकताच रशियावर हल्ला केला आहे. त्यामुळे जगावर याचे खोलवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जागतिक अर्थव्यवस्था संकटात -

आखातामधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स, पुरवठा साखळी, तेल-गॅस आणि इतर क्षेत्रावर मोठा दबाव निर्माण झालाय. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात आली आहे.

पुरवठा साखळी विस्कळीत -

युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे. ज्याप्रमाणे कोविड काळात वस्तूंची ने-आण थांबली होती, तशीच स्थिती आता इंधन आणि अन्नधान्याच्या बाबतीत निर्माण होत आहे.

महागाईचा भस्मासूर -

या युद्धामुळे ऊर्जा आणि खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे गरिबी वाढून सामाजिक अस्थिरता निर्माण होऊ शकते

जागतिक भूक बळीची भीती-

युक्रेन आणि रशिया हे जगाचे 'धान्याचे कोठार' मानले जातात. इथून होणारी धान्य निर्यात थांबल्याने आफ्रिकी आणि आशियाई देशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

पुतीन यांचे हे वक्तव्य पाश्चात्य देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांना उत्तर म्हणून पाहिले जात आहे. निर्बंधांमुळे केवळ रशियाचे नुकसान होत नसून, त्याचे जगावरही परिणाम होतील आणि कोविडसारखी आणीबाणी पुन्हा ओढवेल, असा रशियाचा दावा आहे. एकूणच, पुतीन यांचे हे विधान जगासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कपडे फाडले, दगड उचलले, लाथा बुक्क्यांचा मारा! किल्ले सिंहगडावर भर पावसात तुफान राडा

भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा;राजकीय वर्तुळात खळबळ

कोकण हादरलं ! २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा घरात आढळला मृतदेह; आंबोली परिसरात खळबळ

पाऊस गायब, पण छत्रीसाठी तुफान गर्दी! भाजप नेत्याच्या उपक्रमाची जोरदार चर्चा; खासगी सुरक्षारक्षक तैनात

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर मोठा हवाई हल्ला; क्षेपणास्त्र कारखाना उद्धवस्त

SCROLL FOR NEXT