Kulhad chai : रोज कुल्हडमधील चहा पिताय? सावधान! चवीला भारी पण आरोग्यासाठी घातक, वाढतात 'या' ५ समस्या

Shreya Maskar

मातीच्या भांड्यात चहा पिणे

रेल्वे स्टेशन, हायवेवरील चहाच्या टपऱ्या किंवा छोट्या कॅफेमध्ये मातीच्या कुल्हडमधील चहा पिण्याची मजाच काही और असते! मातीच्या भांड्यातील चहाला एक वेगळी चव आणि सुगंध येतो.

Drinking tea in a clay pot | pinterest

कुल्हड चहा

अनेकांना कुल्हडमधील चहा पिणे आवडते. पण मातीच्या कुल्हडमधील चहा खरोखरच आरोग्यासाठी चांगला असतो का? जाणून घेऊयात.

Kulhad tea | pinterest

धोका कसला?

कुल्हड हा नैसर्गिक मातीपासून तयार केलेला कप असतो. त्यामध्ये चहा दिल्यामुळे तो पर्यावरणपूरक पर्याय मानला जातो. मात्र, कुल्हड बनवण्यासाठी वापरलेली माती, त्याची स्वच्छता आणि भाजण्याची पद्धत यावर त्याची सुरक्षितता अवलंबून असते.

What is the danger? | pinterest

निकृष्ट मातीमुळे आरोग्याला धोका

कुल्हड तयार करण्यासाठी वापरलेली माती दूषित असल्यास त्यामध्ये शिसे , कॅडमियम यांसारखे हानिकारक धातू असू शकतात. अशा भांड्यांमधून गरम चहामध्ये हे घटक मिसळण्याची शक्यता असते.

Health hazards due to poor soil | pinterest

स्वच्छतेचा अभाव

कुल्हड तयार करताना किंवा साठवताना योग्य स्वच्छता राखली नसेल, तर त्यावर धूळ, माती किंवा सूक्ष्मजीव असू शकतात. त्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो.

Lack of cleanliness | pinterest

भांड्याला रासायनिक रंग

काही मातीच्या भांड्यांवर आकर्षक दिसण्यासाठी रंग किंवा ग्लेझ लावले जाते. हे पदार्थ अन्नसुरक्षेच्या मानकांनुसार नसतील, तर गरम पेयांमध्ये हानिकारक घटक मिसळू शकतात.

Chemical paint for pot | pinterest

कुल्हड चहा पिताना कोणती काळजी घ्यावी?

स्वच्छ आणि चांगल्या दर्जाच्या मातीपासून तयार केलेला कुल्हड निवडावा. तडा गेलेले, तुटलेले किंवा खराब पृष्ठभाग असलेले कुल्हड वापरू नयेत. एकदा वापरण्यासाठी बनवलेला कुल्हड पुन्हा वापरू नये.

precautions | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : शंकरपाळी फुलत नाही? मग पीठ मळताना वापरा 'ही' एक ट्रिक, होईल खारीसारखा खुसखुशीत

Shankarpali Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...