Shruti Vilas Kadam
सकाळी उठल्यावर तोंडाची चव आंबट होण्याचे एक कारण म्हणजे अॅसिडिटी. पोटातील अॅसिड वर घशापर्यंत आल्यामुळे तोंडाला आंबट, कडू चव येते.
अनेक जण रात्री उशिरा जेवतात आणि जेवल्यानंतर लगेच झोपतात. यामुळे पोटातील अॅसिड वर येऊ शकते. त्यामुळे झोपण्याच्या किमान तीन तास आधी जेवण करावे.
रात्री झोपताना तोंडात लाळ कमी तयार होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर तोंड कोरडे पडते आणि तोंडाची चव बदलू शकते. शरीरात पाणी कमी असणे, झोपताना तोंडाने श्वास घेणे किंवा औषधे यामुळेही तोंड कोरडे पडू शकते.
दात नीट न साफ केल्याने दातांवर घाण साचते. त्यामुळे तोंडात बॅक्टेरिया वाढतात आणि सकाळी तोंडाची चव खराब होऊ शकते.
सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाण्याने चूळ भरा आणि एक ग्लास पाणी प्या. यामुळे तोंडातील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. दिवसभरही पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.
रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नका. अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा.
सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसातून दोन वेळा दात घासा. जीभही नियमित स्वच्छता करा. असे केल्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.