Mix Veg Bhaji Recipe: रोजच्या भाजीचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा चविष्ट मिक्स व्हेज भाजी, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

मिक्स व्हेज भाजी बनवण्यासाठी साहित्य

१ कप फ्लॉवरचे तुकडे, १ गाजर, अर्धी शिमला मिरची, अर्धा कप मटार, १ बटाटा, २ कांदे, २ टोमॅटो, १ चमचा आले-लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे-जिरे पूड चवीनुसार मीठ तेल आणि कोथिंबीर

Mix Veg Bhaji Recipe | yandex

सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या

सर्वप्रथम गाजर, फ्लॉवर, शिमला मिरची आणि बटाटा स्वच्छ धुवा. त्यानंतर सर्व भाज्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या

Mix Veg Bhaji Recipe

भाज्या थोड्या शिजवून घ्या

एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात फ्लॉवर, गाजर, बटाटा आणि मटार घाला. भाज्या थोड्या मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. त्या पूर्णपणे गाळून बाजूला ठेवा.

Mix Veg Bhaji Recipe

कांदा आणि टोमॅटोची पेस्ट तयार करा

कांदा आणि टोमॅटोचे तुकडे करून घ्या. मिक्सरमध्ये त्यांची बारीक पेस्ट तयार करा. यामुळे भाजीला छान ग्रेव्ही तयार होईल.

Mix Veg Bhaji Recipe

मसाला भाजून घ्या

कढईत तेल गरम करून त्यात कांद्याची पेस्ट घाला. ती थोडी परतल्यानंतर आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट घाला. त्यानंतर हळद, तिखट, गरम मसाला आणि धणे-जिरे पूड घालून मसाला छान परतून घ्या.

Mix Veg Bhaji Recipe

शिजवलेल्या भाज्या मसाल्यात मिसळा

आता तयार मसाल्यामध्ये शिजवलेल्या भाज्या आणि शिमला मिरची घाला. सर्व भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करा.

Mix Veg Bhaji Recipe

भाजीला छान शिजू द्या

भाजीमध्ये थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. कढईवर झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. त्यामुळे मसाला भाज्यांमध्ये छान मुरेल.

Mix Veg Bhaji Recipe

कोथिंबीर घालून सर्व्ह करा

भाजी शिजल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम मिक्स व्हेज भाजी पोळी, पराठा किंवा जीराभातासोबत सर्व्ह करा.

Mix Veg Bhaji Recipe

Morning Routine: सकाळी पाणी पिण्यापूर्वी आवर्जून करा या ७ गोष्टी; आरोग्याला होतील फायदे

Morning Routine | Saam Tv
येथे क्लिक करा