अमेरिका-ब्रिटन रशियाच्या रडारवर; पुतीन यांनी दिली युद्धाची धमकी Saam Tv
देश विदेश

अमेरिका-ब्रिटन रशियाच्या रडारवर; पुतीन यांनी दिली युद्धाची धमकी

रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी कठोर ताकीद दिली आहे की रशियाची नौदल शत्रूंच्या निशाण्यांवर हल्ला करण्यास तयार आहे.

वृत्तसंस्था

रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी कठोर ताकीद दिली आहे की रशियाची नौदल शत्रूंच्या निशाण्यांवर हल्ला करण्यास तयार आहे. विशेष म्हणजे क्रिमियाबाबत अमेरिका आणि ब्रिटन (America-United Kingdom) यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष पुतीन यांचे हे विधान आले आहे. खरं तर, रशियाने 2014 मध्ये जबरदस्तीने क्रिमियाला युक्रेनपासून वेगळे केले होते. परंतु अद्यापही जगातील बहुतेक लोक क्रिमियाला युक्रेनचा भाग मानतात. अमेरिका आणि ब्रिटन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपल्या अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा S -500 आणि झिरकॉन हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.

...तर रशिया युद्ध करेल

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन पिटरबर्ग येथे आयोजीत केलेल्या परेडमध्ये बोलत असताना म्हणाले पाण्यातून येणाऱ्या, पाण्याच्या वरुन येणाऱ्या, हवेतून येणाऱ्या सगळ्या दुश्मानांना उत्तर देण्यासाठी रशिया सक्षम आहे. ते म्हणाले की गरज पडल्यास आम्ही हल्ला देखील करू शकतो. राष्ट्रपतींनी रशियाची नवीन शस्त्रांना अजिंक्य म्हटले आहे. अलीकडेच, रशियाने ब्रिटनची युद्धनौका क्रिमिनियन द्वीपकल्पाजवळ पाठवल्यानंतर आपली लढाऊ विमाने पाठविली. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

अमेरिका तणाव वाढवत आहे- पुतीन

या दरम्यान ब्रिटीश युद्धनौकाजवळ रशियाने बॉम्बांचा पाऊस पाडला होता. अध्यक्षांनी गेल्या महिन्यात घटनेनंतर सांगितले की रशियाने ब्रिटीश युद्धनौका बुडवून टाकली, जे बेकायदेशीरपणे त्याच्या प्रादेशिक पाण्याच्या क्षेत्रात प्रवेश करीत होता. अमेरिका हा तणाव भडकवत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. त्यांनी चेतावणी दिली की रशियन नौदलाकडे आज देशाच्या सुरक्षा आणि राष्ट्रीय हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व काही आहे.

तथापि, रशियाने बॉम्ब टाकण्याच्या दाव्याला ब्रिटिश सरकारने नकार दिला. या अगोदर अध्यक्ष पुतीन म्हणाले आहेत की जगातील सर्वात शक्तिशाली नेव्हींमध्ये रशियाने आपले स्थान बनवले आहे. रशियाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्र बनविले, जे अद्याप जगात कोणिच मोडलेले नाही. बरेच देश आता हे क्षेपणास्त्र बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या अण्वस्त्रांचा दुसरा सर्वात मोठा साठा रशियाकडे आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT