joe Biden  Saam Tv
देश विदेश

व्लादिमीर पुतिन हे हुकुमशहा, अमेरिका युक्रेनच्या पाठिशी - बायडन

अमेरिका आणि नाटो युक्रेनला 1 अब्ज डॉलरची आर्थिक मदत देत आहेत.

वृत्तसंस्था

आपल्या भाषणादरम्यान, जो बायडेन यांनी रशियावर आर्थिक निर्बंधांची घोषणा केली आहे. त्यांनी पुतिन यांच्या युद्धाच्या निर्णयाचा निषेध केला आहे. त्याचबरोबर त्यांनी युक्रेनबद्दल पूर्ण बांधिलकी व्यक्त केली आहे. बायडेन म्हणाले की, अनेक देश युक्रेनच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. बायडेन यांच्या भाषणावेळी युक्रेनचे राजदूतही उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, रशियाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. अमेरिका युक्रेनच्या पाठीशी आहे. रशियाविरुद्ध जो बायडन यांनी निर्बंध अधिक कडक केले आहेत. बायडन म्हणाले की, रशियन विमाने आमचे हवाई क्षेत्रातून उड्डाण घेणार नाहीत.

बायडेन म्हणाले की अमेरिका आणि नाटो युक्रेनला 1 अब्ज डॉलरची आर्थिक मदत देत आहेत. आमचे सैन्य युक्रेनमध्ये थेट हस्तक्षेप करणार नाही. याशिवाय आम्ही युक्रेनला सर्वतोपरी मदत करू. जेथे रशियाचा धोका आहे तेथे नाटोचे सैन्य तैनात करण्यात आले आहे. पुतिन हे जगात एकाकी पडले आहेत.

हे देखील पहा -

पुढे बायडेन म्हणाले की, व्लादिमीर पुतीन यांना युक्रेन इतके कठीण आव्हान उभे करेल याची कल्पना नव्हती. अमेरिकेने रशियन उड्डाणांसाठी आपली हवाई हद्द बंद करण्याची घोषणा केली आहे. ६ दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनविरुद्ध चुकीचे पाऊल उचलले आहे. अत्याचारावर स्वातंत्र्याचा विजय होईल. युक्रेनविरुद्धच्या आक्रमकतेची किंमत रशियाला चुकवावी लागेल.

जो बायडेन यांनी आपल्या भाषणात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हुकूमशहा म्हटले. बायडेन यांनी जाहीर केले की अमेरिका युक्रेनच्या प्रत्येक जमिनीचे रक्षण करणार असल्याते आश्वासन दिले आहे, तसेच हुकूमशहांना किंमत मोजावी लागते. आमचे सैन्य युक्रेनमध्ये जाणार नाही. युक्रेनवर हल्ला करून रशिया कमकुवत होईल. संयुक्त राष्ट्रांची ताकद जगभरातील लोकांना दिसेल. रशियाच्या खोट्या वागण्याच आम्ही सत्याने सामना केला आहे. जगभरात लोकशाहीचा उदय होत आहे.

अमेरिकन संसदेत बायडेन म्हणाले की जर रशियन सैन्याने पश्चिमेकडे सरकले तर त्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल. आम्ही युक्रेनच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत. पुतिन यांनी युक्रेनवर जाणीवपूर्वक हल्ला केला आहे. पुतीन यांना कोणताही देश हिसकावू देणार नाही. लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यातील हे युद्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT