Visakhapatnam Fire News Saam TV
देश विदेश

Visakhapatnam Fire News: विशाखापट्टणम बंदरात अग्नितांडव! लागोपाठ ४० बोटींनी घेतला पेट; मच्छिमारांचे कोटींचे नुकसान

Visakhapatnam Fishing Harbour: मासेमारी बंदरात एका बोटीत अचानक भीषण आग लागली आहे. या घटनेत 40 बोटी जळून खाक झाल्यात.

Ruchika Jadhav

Visakhapatnam:

विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथून मोठी बातमी समोर आलीये. शहरातील मासेमारी बंदरात एका बोटीत अचानक भीषण आग लागली आहे. आग पुढे वाढत गेल्याने या घटनेत 40 बोटी जळून खाक झाल्यात. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीची (Fire) माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याअसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. स्थानिक मच्छिमारांनी या बोटीला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रविवारी रात्री मच्छीमारी करून अनेक बोटी किनाऱ्यावर परतल्या होत्या. यावेळी अचानक एका बोटीत स्फोट झाल्याचा आवाज आला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मच्छीमारांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. या स्फोटात बोटीला आग लागली. पुढे ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली. आगीत तब्बल 40 बोटी जळून खाक झाल्यात.

या दुर्घटनेत आग नेकमी कशाने लागली याचे ठोस कारण अद्याप समजलेले नाही. स्फोट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र काही मच्छीमारांनी या बोटीला आग लावली असावी असाही संशय अन्य मच्छीमारांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी घटनास्थळी पाहाणी केली असून अधिक तपास सुरू आहे.

मच्छीमारांसाठी आपल्या बोटी म्हणजे उदनिर्वाहाचे मोठे साधन. मात्र आता बोट जळून खाक झाल्याने पुढे काय करावं आणि जगावं कसं असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT