Punjab AAP Leader Short Death  Saam tv
देश विदेश

Punjab Crime : लग्नामध्ये रक्तरंजित थरार! बड्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Punjab AAP Leader Short Death : पंजाबमध्ये भर लग्नसमारंभात आम आदमी पक्षाच्या नेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • अमृतसरमधील लग्न समारंभात AAP नेत्याची गोळी झाडून हत्या

  • सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झाली, व्हिडिओ व्हायरल.

  • नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • पोलिसांकडून तपास सुरु

पंजाबच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. अमृतसर जिल्ह्यात रविवारी एका लग्न समारंभात दोन अज्ञात हल्लेखोरांनी आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्याची आणि गावाच्या सरपंचाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातारवर्ण निर्माण झाले आहे. दरम्यान लग्नसमारंभाच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हत्येचा थरार कैद झाला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित जरमल सिंग (५०) हे तरनतारन जिल्ह्यातील वलतोहा गावचे सरपंच होते. ते शेजारच्या अमरकोट गावाचे सरपंच हरजीत सिंग सेरी यांच्या बहिणीच्या लग्नासाठी अमृतसरमधील वेर्का बायपासजवळील एका खाजगी रिसॉर्टमध्ये गेले होते. कार्यक्रम सुरु असताना काही वेळानंतर लग्नाला आलेल्या पाहुण्यांसारखा पेहराव करून काही हल्लेखोर त्यांच्याजवळ आले. त्यांनी पिस्तूल त्यांच्यावर रोखत हल्ला केला. या हल्ल्यात जरमल सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. लग्नसमारंभात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ, शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर केला आहे, त्यात दोन पुरुष हूड आणि जीन्स घातलेले असून ते बंदुका घेऊन गर्दीतून चालत आहेत. व्हिडिओमध्ये, जरमल सिंग एका टेबलावर बसलेले दिसत आहेत. त्यांनी पिवळी पगडी घातली आहे आणि ते दुसऱ्या पाहुण्यांशी बोलत आहे. काही क्षणातच हल्लेखोर त्याच्याकडे आले, जवळून गोळीबार करत घटनास्थळावरून पळ काढला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पाहुण्यांमध्ये गोंधळ उडाला.

हल्ल्यानंतर सिंह यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि गोळीबारात झालेल्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे पुष्टी केली. या हत्येचा निषेध करताना, अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती यासाठी पंजाब सरकारला जबाबदार धरले. घटनेनंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिस उपायुक्त (शहर) जगजित सिंग वालिया म्हणाले की, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT