Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : बापरे बाप! गायकाचं गाणं इतकं आवडलं की चाहत्यांनी पाडला पैशांचा पाऊस; पाहा व्हिडिओ

यामध्ये १०, २०, ५०, १०० आणि ५०० नोटा देखील उडवण्यात आल्यात, असं काही जण म्हणत आहेत.

Ruchika Jadhav

Viral Video : संगीतात एक जादू असते असं म्हणतात. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात गाणी ऐकल्यावर मन शांत होतं. जीवनातला ताणतणाव कमी होतो. प्रत्येक गायक आपली कला जोपासत नित्यनियमाने रियाज करतो. गायकाच्या गाण्यांनी मंत्रमुग्ध होत चाहते त्यांना वेगवेगळ्या भेटवस्तू देखील देतात. सध्या सोशल मीडियावर एका गायकावर नोटांचा वर्षाव करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Kirtidan Gadhvi)

गायक कीर्तिदान गढवी याचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये त्याचं गाणं ऐकून चाहत इतके खूश झाले आहेत. सर्वांनी या गायकावर पैशांचा पाऊस केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कीर्तिदान व्यासपीठावर बसून आपली कला सादर करत आहे. तर दुसरीकडे त्याच्यासमोर पैशांचा ढीग जमा झाला आहे. तो गाणं गात असताना १५ ते २० व्यक्ती त्याच्यासमोर येऊन त्याच्यावर नोटांचा वर्षाव करत आहेत. यामध्ये १०, २०, ५०, १०० आणि ५०० नोटा देखील उडवण्यात आल्या, असं काही जण म्हणत आहेत.

हिंदी वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातच्या वलसाद येथे ११ मार्च रोजी कीर्तिदान गढवी या गायकाच्या संगिताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चाहत्यांकडून नोटांचा पाऊस करण्यात आला आहे. गायक गाकीर्तिदान गढवी नेहमीच चर्चेत असतो. गेल्या वर्षी देखील त्याच्या संगिताच्या कार्यक्रमातला असाच एक व्हिडिओ समोर आला होता. त्यावेळी उडवलेले पैसे मोजले असता ५० लाखांची रक्कम जमा झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये पालिकेच्या अपारदर्शकते विरोधात काँग्रेसचे आंदोलन

Sonali Kulkarni Photos: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सुंदर लूक, फोटोंनी केलं घायाळ

Diana Penty: डायना पेंटीचे १०० वर्षे जुने घर पाहून नेटकरी थक्क, पाहा सुंदर फोटो

Shocking News : नवी मुंबई हादरली! हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या तरुणीने इमारतीच्या १०व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रावर पुन्हा संकट; सलग ३ दिवस पाऊस कोसळणार, कोणत्या जिल्ह्यांना फटका बसणार?

SCROLL FOR NEXT