Fact Check Saam
देश विदेश

Fact Check Video: दिल्ली विमानतळावर स्फोट केल्याचा पाकिस्तानचा दावा; व्हायरल VIDEO मागचं सत्य काय?

Government Warns Against Fake News Amid India-Pakistan Tensions: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती सध्या शिगेला पोहोचली आहे. पाकिस्तानकडून हल्ले आणि भारताकडून प्रतिहल्ले सुरु असतानाच सोशल मीडियावर अनेक फेक व्हिडिओ आणि बातम्या व्हायरल होत आहेत.

Bhagyashree Kamble

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती सध्या शिगेला पोहोचली आहे. पाकिस्तानकडून हल्ले आणि भारताकडून प्रतिहल्ले सुरु असतानाच सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि बातम्या व्हायरल होत आहेत. तसेच फेक न्यूज देखील व्हायरल होतात. फेक बातम्यांमुळे सामांन्यांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे.

अशातच दिल्ली एअरपोर्टवर स्फोट झाल्याची बातमी आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण खरंच दिल्लीच्या विमानतळावर स्फोट नक्की झाला होता का? या व्हिडिओचा फॅक्ट चेक करण्यात आला आहे.

पीआयबीने हा व्हिडिओ शेअर केला असून, त्यांनी दिल्ली येथील एअरपोर्टवर कोणताही स्फोट झाला नसल्याची माहिती दिली. हा व्हिडिओ खरंतर ऑगस्ट २०२४ मधील येमेनमधील एडन शहरातील एका पेट्रोसपंपावर झालेल्या स्फोटाचा आहे. या व्हिडिओचा भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही, असं पीआयबीने म्हटलं आहे.

फेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारने लोकांना फेक बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणारी कोणतीही बातमी तपासल्याशिवाय शेअर करू नये आणि अधिकृत वेबसाईटवरील बातम्यांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासन आणि लष्कराने नागरिकांना आवाहन करत म्हटलं की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही बातम्या तपासल्याशिवाय शेअर करू नका. चुकीची माहिती केवळ संभ्रम निर्माण करते. त्यामुळे सत्य जाणून घ्या, सतर्क रहा, अफवा टाळा, खोट्या बातम्या पसरवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Lucky zodiac signs: रविवारची त्रयोदशी ठरणार शुभ! ४ राशींना आर्थिक लाभ व मानसिक शांतीचे संकेत

IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

Palash Muchhal Net Worth : स्मृती मानधाना की पलाश मुच्छल कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?

SCROLL FOR NEXT