Viral Video|अबब! खासदारच विसरले राष्ट्रगीत Twitter/@PranshuDutt
देश विदेश

Viral Video|अबब! खासदारच विसरले राष्ट्रगीत

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

वृत्तसंस्था

लखनऊ - भारतातील लहान मुलांना सुद्धा राष्ट्रीय प्रतीकांची खूप जाणीव आहे. पण एखादा लोकप्रतिनिधीच देशाच्या अभिमानाच्या गोष्टी विसरला तर तुम? अनेकदा १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला असे प्रकार समोर येतात. यावेळी अशीच काहीशी घटना मुरादाबादचे Muradabad सपा खासदार डॉ.एस.टी. हसन S.T. Hassan यांच्यासोबत घडली आहे.

हे देखील पहा -

काल १५ ऑगस्ट रोजी ध्वज फडकावल्या नंतर डॉ.एस.टी. हसन  चक्क राष्ट्रगीतच विसरले. खासदाराने ध्वज फडकवताच तिथे उपस्तिथ असलेल्या नागरिकांनी राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली, पण डॉ.एस.टी. हसन हे मात्र राष्ट्रगीत विसरले जेव्हा ते दुसऱ्या ओळीवर अडकले तेव्हा त्यांनी इकडे तिकडे पाहण्यास सुरुवात केली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ते देखील काही वेळासाठी अस्वस्थ झाले आणि त्यांनी हळूहळू जय हे जय हे म्हणायला सुरुवात केली. मग बाकीच्या नागरिकांनी देखील सरळ शेवटच्या ओळीवर गेले आणि कार्यक्रम संपवून निघून गेले. हसन आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

याआधी त्यांनी राम मंदिराबाबतही वादग्रस्त विधान केले होते. मात्र, खासदारासोबत झालेल्या या घटनेची लोकांनी अक्षरशः  खिल्ली उडवली. जेव्हा खासदार किंवा देश चालवणारे लोकच राष्ट्रगीत विसरतील तेव्हा इतरांपर्यंत काय संदेश पोहोचेल आणि यासोबतच हा राष्ट्रगीताचा अपमान असल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

SCROLL FOR NEXT