Couple Viral Video saam tv
देश विदेश

Viral Video : भावानं बादच केलं की...गर्लफ्रेंडला असा काय प्रपोज केला की नकार देण्याचा सवालच न्हाय!

एक वेडिंग प्रपोझलचा युनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Nandkumar Joshi

Viral News Video : लग्नासाठी प्रपोज करणं आणि होकार मिळवणं हे प्रत्येकासाठीच एक मोठी परीक्षा असते. प्रेमविवाहात तर लग्नासाठी मागणी हा टप्पा खूपच महत्वाचा असतो. त्यानं किंवा तिनं केलेला प्रपोज हा कायम आठवणीत राहावा, असाच असावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. अशा वेळी प्रत्येक कपलचं हे स्वप्न असतं की लग्नासाठीचा प्रपोजल हा जगावेगळा असावा. ( love marriage proposal couple viral video update)

सोशल मीडियावर तर असे अनेक व्हिडिओज आहेत. त्यात तो/ती आपल्या जोडीदाराला लग्नासाठी मागणी (love marriage) घालताना काहीतरी हटके करताना दिसतात. कुणी ड्रिंकमध्ये आपल्या पार्टनरला अंगठी देतो, तर कुणी अख्ख्या जगासमोर अगदी 'हिरो' स्टाइलनं माझ्याशी लग्न करशील का? असं विचारताना दिसतात.

असाच एक वेडिंग प्रपोझलचा युनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपलाही वेडिंग प्रपोझल असाच असावा, असं काही कपलना हा व्हिडिओ बघून वाटलं असावं. त्यात या प्रपोझलचं रोमँटिक हिरो शाहरूखशी खूप खास नातं असल्याचं दिसतंय.

वेडिंग प्रपोझलचा ४४ सेकंदाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. पॅरिसमधलं ठिकाण दिसतंय. आपल्या गर्लफ्रेंडला तरूण प्रपोज करताना दिसतोय. शाहरूख खानचा चित्रपट 'कुछ कुछ होता है' मधील कोई मिल गया हे गाणं वाजतंय. पाऊस पडतोय. त्या तरुणाच्या पाठीमागे आयफेल टॉवर दिसतोय आणि तो तरूण रेड कार्पेटवर उभा आहे. त्याच्या पाठीमागे Marry Me असा छान सजवलेला सेट दिसतोय.

रोमँटिक वाटावं म्हणून मेणबत्त्या आणि गुलाबाच्या पाकळ्याही सेटवर आहेत. या सगळ्यात तो तरूण शाहरूखच्या डान्स स्टेप्स करत करत आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करताना या व्हिडिओत बघायला मिळतोय. हा व्हिडिओ कधी आणि नेमका कधी चित्रित केलेला आहे, याबाबत काही ठोस माहिती मिळू शकली नाही.

हा व्हिडिओ एका युजरने १५ ऑक्टोबरला ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले होते. हजारो लाइक्स आणि हजारोंनी रीट्विट केलं होतं. या व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. दोघे केवळ अन् केवळ एकमेकांसाठीच बनले आहेत, अशी लक्षवेधी प्रतिक्रिया एका यूजरने नोंदवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT