Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video: नवरा गाणं म्हणत नाही, बायकोची थेट पोलिसांत तक्रार; मग पोलिसांसमोरच लावले सूर, पाहा VIDEO

Couple Fights : एक पती पत्नीचं एक अजब भांडण समोर आलं आहे. यामध्ये एका गाण्यासाठी पत्नीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

Ruchika Jadhav

Viral Video Couple Fights : नवरा बायको यांच्यातील वाद हे काही मिनीटांसाठीचे असतात. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या वादामध्ये सहसा लक्ष घालण्यास नकार देतात. मात्र हे वाद रुसव्या फुगव्यांपर्यंत असतील तर ठिक. पती जर आपल्या पत्नीला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असेल, अथवा त्याचे बाहेर अन्य महिलांशी संबंध असतील तर महिला पोलिसांत धाव घेतात. अशात आता एका पती पत्नीचं एक अजब भांडण समोर आलं आहे. यामध्ये एका गाण्यासाठी पत्नीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. (Viral Video)

पती पत्नी या नात्यात लग्नानंतर नव्या नवरीचे नऊ दिवस झाले की, लगेचच रुसवे फुगवे सुरु होतात. अनेकवेळा लग्नाचा वाढदीवस विसरणे, गिफ्ट न देणे, कामात मदत न करणे अशा कारणांवरून पती पत्नीमध्ये वाद झाले आहेत. अशाच प्रकारे आपला पती आपल्यासाठी गाणं गात नाही याचा महिलेला राग आला. पतीने गाणं गाऊन दाखवावं यासाठी ती हट्टाला पेटली. मात्र पती काही गाणं गाण्यास तयार नव्हता.

पती ऐकत नसल्याने पत्नीला त्याचा इतका राग येतो की, ती पतीची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाते. पती पत्नीच्या या केमेस्ट्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पोलीस ठाण्यात हे दोघेही पती पत्नी उभे आहेत. यावेळी पतीने आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतलं आहे. त्यानंतर आपल्या जमेल तसा सूर लावून हा पती गाणं गात आहे.

पत्नी मात्र यावेळी देखील रुसलेली दिसत आहे. या दोघांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. @arvindchotia या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडिओ (Video) पाहून खळखळून हासत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT