VIRAL VIDEO : डोळ्यांदेखत मगरीनं त्या मुलाला नदीत खेचलं अन्...काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल, बघून हादराल!  saam tv
देश विदेश

VIRAL VIDEO : डोळ्यांदेखत मगरीनं त्या मुलाला नदीत खेचलं अन्...काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल, बघून हादराल!

VIRAL VIDEO NEWS : नदीकाठी हातपाय धुणाऱ्या मुलावर मगरीनं अचानक हल्ला चढवला. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच त्याला नदीपात्रात खेचून नेलं. काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Saam Tv

सोशल मीडियावर काळजाचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेची दृश्ये बघून एखादा दगडाच्या काळजाचा असला तरी तोही हादरून जाईल. उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील टिकुरी गावाजवळ ही भयंकर घटना घडली. १२ वर्षांच्या मुलावर नदीकाठावर हातपाय धुताना मगरीने हल्ला चढवला. त्याला नदीपात्रात ओढून नेले. यात मुलाचा मृत्यू झाला. तत्पूर्वी मगरीनं हल्ला केला तेव्हा त्याचा काका न घाबरता मुलाला वाचवण्यासाठी नदीपात्रात उतरला. मुलाला वाचवण्याचे त्याने प्रयत्न केले. एक-दोन नव्हे तर आठ मिनिटे तो मगरीशी झुंजला. पण मुलाला वाचवण्यात त्याला अपयश आलं. काही वेळाने स्थानिकही मदतीसाठी धावून आले. पण मगरीच्या तावडीतून मुलाला ते वाचवू शकले नाहीत.

नेमकं काय घडलं?

सुनील आपल्या काकांसोबत विजय आणि उदय राज सिंह यांच्यासोबत शेतावर गेला होता. शेतात काम करून त्याचे हातपाय आणि कपडे प्रचंड मळले होते. घरी जाताना वाटेत घागरा नदी होती. या नदीवरच मळलेले कपडे आणि हातपाय धुण्यासाठी थांबला होता. पण तिथेच दबा धरून बसलेल्या मगरीने सुनीलवर झडप घातली.

मगरीने सुनीलला पाण्यात ओढले. सुनीलची किंचाळी ऐकताच काकाने क्षणाचा विलंब न करता पाण्यात उडी घातली. आपल्या पुतण्याला मगरीच्या तावडीतून सोडवण्यासाठी काकाने तब्बल ८ मिनिटे मगरीशी दोन हात केले. परंतु नरभक्षी मगरीच्या ताकदीच्या पुढे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. सगळ्यांच्या डोळ्यांदेखत मगरीने सुनीलला पु्न्हा खोल पाण्यात नेले आणि ४ ते ५ वेळा मगरीने त्याला पाण्यात आपटले.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामसेवक, स्थानिक पोलिस प्रशासन, वन विभाग अधिकारी, NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्षणाचा देखील विलंब न करता NDRF च्या पथकाने तात्काळ मदतकार्य सुरू केले. मुलाला जबड्यात घट्ट पकडून मगर पुन्हा वर येऊन खाली पाण्यात गायब व्हायची. त्यामुळे मगरीला पकडण्यात अनेक अडचणी येत होत्या. बचावकार्य पथके आणि स्थानिकांच्या मदतीने ३ तासांनंतर सुनीलला शोधण्यात यश आले. घडलेल्या घटनास्थळापासून तब्बल ३०० मीटरवर सुनीलचा मृतदेह छिन्न- विछिन्न अवस्थेत आढळला. काही वेळाने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी वनविभागाने मगरीला पकडले.

सुनील हा अनाथ मुलगा होता. ७ वर्षांपूर्वी त्याचे आईवडील हे जग सोडून गेले होते. त्यांच्या पश्चात त्याला एक मोठी बहीण आणि दोन लहान भावंडे आहेत. आईवडील गेल्यानंतर सुनील आणि त्याच्या भावंडांना काकांनी सांभाळलं होतं. सुनीलच्या अशा दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, याची पडताळणी झालेली नाही.

Maharashtra News Live Update: पुण्यातील गुडलक चौकात डी जे विरोधात काही पुणेकर एकवटले

Bonus 2026 : दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट? ₹7,000 ऐवजी मिळणार ₹21,000

Chutneys for weight loss: काही केल्या पोटावरची चरबी जातच नाहीये? या 5 प्रकारच्या चटणी करतील तुमची मदत

७ आठवड्यांची गरोदर होती इन्फ्लुएन्सर; जिवंत जाळण्यापूर्वी घडलेला भयानक प्रकार समोर

Akola : अकोल्यात खाद्यतेलाच्या दोन पेढ्यांवर FDAची मोठी कारवाई; 11.82 लाखांचा तेलसाठा जप्त

SCROLL FOR NEXT