Priyanka Gandhi Viral Video
Priyanka Gandhi Viral Video Saam TV
देश विदेश

Priyanka Gandhi Viral Video: राजकारणी प्रियंका गांधी झाल्या 'शेफ', म्हैसूरच्या हॉटेलमध्ये बनवला डोसा, पाहा व्हिडीओ

Satish Kengar

Priyanka Gandhi Viral Video : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या म्हैसूरमधील एका हॉटेलमध्ये डोसा बनवताना दिसल्या आहेत.

प्रियांका गांधी या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार आणि रणदीप सिंग सुरजेवाला हे देखील आहेत.

सोशल मीडियावर (Socaila Media) व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) प्रियंका गांधी डोसे तयार करताना आणि हॉटेलच्या स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. व्हिडीओत दिसत असलेलं रेस्टॉरंट मल्यारी हॉटेल म्हणून प्रसिद्ध आहे, जे म्हैसूरमधील सर्वात जुन्या जेवणाच्या ठिकाणांपैकी एक आहे. (Viral News)

हॉटेलमध्ये डोसा तयार केल्यानंतर प्रियांका यांनी हॉटेल मालक आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानले आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढला.

दरम्यान, 224 जागांच्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात 10 मे रोजी होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

मंगळवारी म्हैसूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, 'पंतप्रधान इथे आले आणि म्हणाले की विरोधी पक्षाच्या नेता त्यांच्या मृत्यूची वाट पाहत आहेत. त्यांना नेमकं म्हणायचं काय आहे? देशातील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधानांचे चांगले आरोग्य हवे आहे.''

त्या म्हणाल्या, "कर्नाटकच्या जनतेने त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीनुसार मतदान केले पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरून नाही," त्या म्हणाल्या, भाजपने राज्यात कोणतेही विकास काम केले नसल्याने कर्नाटकात परिवर्तनाची वेळ आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

SCROLL FOR NEXT