Viral Video Saam TV
देश विदेश

VIDEO : पाचव्या मजल्यावरुन पडली २ वर्षांची चिमुकली; त्यानं अलगद झेललं, पाहा व्हिडिओ...

या व्यक्तीने त्या मुलीला झेललं नसतं तर मोठ अनर्थ घडला असता.

साम टिव्ही ब्युरो

बीजिंग : सोशल मीडियावर (Social Media) नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका उंच इमारतीवरून खाली पडलेल्या मुलीला एक व्यक्ती अलगदपणे झेलतो.

अनेकदा आपण चित्रपटांमध्ये अशी दृश्य पाहतो. मात्र ही दृश्य चित्रपटातील नाही तर, रिअल लाईफमधील आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक पुरुष आणि एक महिला रस्त्याच्या बाजूला उभे आहेत. पुरूषासोबत उभ्या असलेल्या महिलेची अचानक वर नजर जाते.

त्यावेळी महिला आणि तिचा पुरूष साथीदार दोघंही पुढे धावतात. त्याच वेळी त्या व्यक्तीचा पाय देखील घसरतो. स्वत:ला सावरून तो लगेच उभा राहतो. तेवढ्यात इमारतीवरून एक चिमुकली मुलगी खाली पडते, त्या लहान मुलीला ती व्यक्ती अगदी अलगदपणे झेलते, या व्यक्तीने त्या मुलीला झेललं नसतं तर मोठ अनर्थ घडला असता.

माहितीनुसार, हा व्हिडिओ चीनच्या झेजियांग प्रांतातील असून तेथील एका सरकारी अधिकाऱ्याने आपल्या ट्विटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. 13 सेकंदांचा हा व्हिडिओ हृदय हेलावून टाकणारा आहे. आतापर्यंत व्हिडिओला लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहे.

चिमुकलीचे प्राण वाचवणाऱ्या या रिअल हिरोचे नेटकरी कौतुक करत आहेत. केवळ चित्रपटातच नाही तर जगातही खरे हिरो असतात असं नेटकरी म्हणत आहेत. एका नेटकऱ्याने दोघांनाही पदक मिळालं पाहिजे अशी कमेंट केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT