Viral Video X
देश विदेश

Viral Video : भाजपच्या आमदाराने तिरंग्यानं पुसलं नाक, राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यानं नेटकऱ्यांचा संताप

Viral News : सोशल मीडियावर भारतीय जनता पार्टीचे आमदार बालमुकुंद आचार्य यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी तिरंग्याने चेहरा पुसला. या कृत्यामुळे बालमुकुंद आचार्य यांना ट्रोल केले जात आहे.

Yash Shirke

भारतीय जनता पार्टीचे राजस्थानमधील आमदार बालमुकुंद आचार्य यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी तिरंग्याने नाक पुसल्याचे पाहायला मिळते. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी भाजपकडून देशभरात १० दिवसांच्या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये बालमुकुंद आचार्य यांनी चेहऱ्यावरचा घाम तिरंग्याने पुसरल्याने वादाला सुरुवात झाली आहे. हा व्हिडीओ शेअर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये भाजपचे आमदार बालमुकुंद आचार्य तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या एका हातात गदा आहे, तर दुसऱ्या हातात 'ऑपरेशन सिंदूर पराक्रम अभूतपूर्व' असे लिहिलेला बोर्ड आणि तिरंगा असल्याचे दिसते. चालताना बालमुकुंद आचार्य नाक, तोंड पुसण्यासाठी तिरंग्याचा वापर करतात असे व्हिडीओमध्ये दिसते.

यानंतर बाजूला चालत असलेला कार्यकर्ता बालमुकुंद आचार्य यांना चेहरा पुसण्यासाठी दुसरा कपडा देतो, ते त्या कपड्याने चेहरा पुसतात. त्यांच्यामागे बरेचसे लोक चालत असल्याचे दिसते. पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणा लोक देत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

देशभक्तीचे प्रमाणपत्र देणारा आमदार तिरंग्याने नाक पुसत आहे. अशा प्रकारे तिरंग्याचा मान राखला जातो का? राष्ट्रध्वजाचा अपमान करणे हा गंभीर गुन्हा आहे, असे म्हणत काँग्रेसच्या खासदाराने बालमुकुंद आचार्य यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही बालमुकुंद आचार्य यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बालमुकुंद आचार्य यांनी माफी मागावी अशी मागणी राजस्थान काँग्रेसने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Politics : निवडणुकीआधी अजित पवारांची ताकद वाढली, एकाचवेळी ४०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai Crime : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास, पोलिसांकडून दोघांना अटक

Reshma Shinde : अभिनेत्री रेश्मा शिंदे आई तुळजाभवानीच्या दर्शनाला, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT