Viral Video Twitter/@PedroHTunes
देश विदेश

VIRAL VIDEO: चमकदार डोळ्यांच्या रहस्यमय प्राण्याने बोटीवर बसलेल्या मच्छिमाराचा पाठलाग केला अन्...

रात्री समुद्रातून प्रवास करणे हा अनेक प्रकारे एक रोमांचक अनुभव आहे. परंतु काहीवेळा ते धोकादायक देखील ठरू शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रात्री समुद्रातून प्रवास करणे हा अनेक प्रकारे एक रोमांचक अनुभव आहे. परंतु काहीवेळा ते धोकादायक देखील ठरू शकते. असाच दक्षिण ब्राझीलच्या किनार्‍यावर समुद्रात जाण्यासाठी निघालेल्या एका मच्छिमाराला एक भयानक अनुभवाला सामोरे गेले आहेत. एक चमकदार डोळे असलेला हा सागरी प्राणी या मच्छीमाराच्या मागे वेगाने येत होता. आणि पूढे जे काही घडले मग ते पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. जसे की काय त्या मच्छिमाराची शिकार करायची होती असा हा प्राणी वेगवान बोटीच्या मागे वेगाने वारंवार पाण्यातून उडी मारत होता. काही वेळाने पाठलाग करत असताना तो प्राणी मच्छिमाराच्या अगदी जवळ आला मात्र, पुढे काय झालं हे पाहण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ पाहा- (Viral Video On social Media)

सध्या या रहस्यमय प्राण्याचा पाठलाग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या 47 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये रहस्यमय प्राणी पाण्यातून उडी मारत आहे आणि नंतर खाली पाण्यात जाताना दिसून येत आहे. अंधार असल्यामुळे फक्त त्याचे दोन डोळे चमकताना दिसून येत आहेत. व्हिडीओ पाहताना असेच वाटते की, हा प्राणी आता मच्छीमाराची शिकार करणार की काय असं वाटू लागतं. मच्छीमार सुद्धा तितक्याच हुशारीने या प्राण्यापासून स्वतःचा बचाब करत आहेत.


पहा तो व्हिडीओ-

सुदैवाने मच्छीमार बचावण्यात यशस्वी झाला. तो प्राणी पाण्यात पडला. त्यानंतर मच्छीमाराने हा प्राणी पकडला. पण तो कोणता प्राणी आहे हे मात्र अद्याप कळू शकले नाही. या व्हिडीओसोबत पोर्तुगीज भाषेत कॅप्शन लिहिली आहे. “एक रहस्यमय प्राणी काल रिओ ग्रांडे डो सुल येथे एका बोटीचा पाठलाग करत होता.” असे या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत- पाकिस्तान मॅचवरून वाद पेटला, विरोधकांनी सरकारला संसदेत घेरलं

Pune Rave Party Case: मोठी अपडेट! एप्रिल-मे महिन्यातही त्याच हॉटेलमध्ये झाली होती पार्टी; कोण- कोण होत होणार तपास

Maharashtra Live News Update: मुख्य निरीक्षण अधिकारी 1.75 लाखांची लाच घेताना ACB च्या सापळ्यात अडकला

Honey Trap: नाशिकनंतर साताऱ्यातही हनी ट्रॅप? 2 माजी मंत्री, मंत्र्याचा मुलगा हनी ट्रॅपमध्ये?

Accident : भाजप आमदाराच्या आश्रमशाळेत भीषण अपघात, पाण्याची टाकी कोसळून १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT