Viral News Update SAAM TV
देश विदेश

Viral Video : मित्राच्या लग्नात चक्क साडी नेसून गेले, नवरदेवाची 'लय भारी' रिअॅक्शन, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

Viral News Update : लग्नसोहळा म्हटलं की नटून थटून जाणं आलंच. त्यात वधू-वरपक्षाकडील मंडळी आघाडीवर. नवरदेव किंवा नवऱ्यामुलीचे मित्र-मैत्रिणीही सोहळ्यात मिरवताना दिसतात. हल्ली तर एक नवीनच 'फॅशन' आलीय. नवरदेव-नवऱ्यामुलीचे मित्र-मैत्रीण मंडपातूनच स्टेजवर नाचत-नाचत जातात आणि मित्राला/मैत्रिणीला सरप्राइज देतात. असंच हटके सरप्राइज दोन मित्रांनी आपल्या जिगरी दोस्ताला दिलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मित्राचं लग्न होतं आणि त्या लग्नाला जाण्यासाठी काहीतरी हटके करायचं असा विचार दोन मित्रांनी केला. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात दोघांनी साडी नेसली. मग काय धम्मालच. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक महिला या दोन्ही मित्रांना साडी नेसवण्यासाठी मदत करत आहे. 'भारी'वाली साडी नेसल्यानंतर ते दोघेही लग्नाच्या ठिकाणी जाण्यास निघाल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. (Viral News)

साडी नेसल्यानंतर या दोघांनी कपाळावर टिकलीही लावली. या नव्या लूकमध्ये दोस्ताला सरप्राइज देण्याची तयारी झाली. शिकागोच्या मिशिगन एॅव्हेन्यूमध्ये ते आपल्या मित्राकडे पोहोचले. त्याचवेळी नवरदेव आणि नवऱ्यामुलीनं या दोघांना बघितलं. त्याचं रुपडं बघितल्यानंतर त्यांना हसू आवरलं नाही. ते दोघेही जोरजोरात हसू लागले. त्यानंतर आश्चर्याचा धक्का बसलेल्या नवरदेवानं आपल्या या दोन्ही जिगरी मित्रांना मिठी मारली आणि त्यांचं स्वागत केलं. (Viral Video)

हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर paraagonfilms नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो जणांनी हा व्हिडिओ बघितला आहे. तसेच आतापर्यंत ६८ हजारांपेक्षा अधिक जणांनी या व्हिडिओला लाइक केलं आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

हेच खरे मित्र आहेत, कैक महिन्यांनंतर मी ऑनलाइन अशी काहीतरी चांगली गोष्ट बघितली आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. आजकाल लोक जरा जास्तच क्रिएटिव्ह झाले आहेत, असे एका यूजरने म्हटले आहे. तर या मुलांनी साडी नेसून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे, असं अन्य एका यूजरने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT