Man Alive After Death Viral Saam TV
देश विदेश

Man Alive After Death Viral : मृत्यूनंतर तो 7 मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला; व्यक्तीने सांगितलेला अनुभव ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल

Viral Reddit Post : खऱ्या आयुष्यात देखील एका व्यक्तीने मृत्यू होऊन पुन्हा जिवंत झाल्याचा दावा केला आहे. तसेच त्याने यामध्ये त्याला आलेला अनुभव सुद्धा सांगतिला आहे.

Ruchika Jadhav

मी माझा मृत्यू डोळ्यांसमोर पाहिला, मृत्यूनंतर मी वेगळ्या दुनियेत गेलो होतो, असे किस्से तुम्ही विविध चित्रपटांच्या काही सीनमध्ये हमखास पाहिले असतील. अनेक हॉरर फिल्म्समध्ये आपल्याला असे सीन पाहायला मिळतात. प्रत्यक्षात असं काही घडत नाही, असं बरेचजण म्हणतात. मात्र खऱ्या आयुष्यात देखील एका व्यक्तीने मृत्यू होऊन पुन्हा जिवंत झाल्याचा दावा केला आहे. तसेच त्याने यामध्ये त्याला आलेला अनुभव सुद्धा सांगतिला आहे.

या व्यक्तीने सांगितलेला अनुभव ऐकून तुमच्याही काळजात धस्स होईल. तसेच हा व्यक्ती खोटं सांगत आहे की काय? असा प्रश्न सुद्धा तुमच्या मनात येऊ शकतो. सोशल मीडियावर @AlaskaStiletto या सोशल मिडिया अकाउंटवर एका व्यक्तीने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने मृत्यूनंतर पुन्हा कोण कोण जिवंत झालं आहे? आणि याबाबत त्या त्या व्यक्तीचा काय अनुभव आहे तो शेअर करा, असं म्हटलं आहे.

या पोस्टला विविध व्यक्तींनी अनेक रिप्लाय केलेत. त्यातील @BOBauthor या व्यक्तीचा रिप्लाय खरोखर काळजात धस्स करणारा होता. या व्यक्तीने मी ७ मिनिटे जिवंत नव्हतो. माझं हृदय बंद झालं होतं, असा दावा केलाय. तर ब्रेन स्ट्रोक देखील झाल्याचं म्हटलं आहे. या व्यक्तीने हा प्रसंग सांगताना अगदी सुरुवातीपासून माहिती दिली आहे.

या व्यक्तीने पोस्टमध्ये सांगितलं की, गेल्या वर्षी मार्च महिन्यात मी अचानक फार आजारी झालो. मला श्वास घेण्यात अडचणी आल्या. लंग्स हॅमरेज झाल्याने मला रक्ताच्या खूप जास्त उलट्या झाल्या. रक्त इतक्याप्रमाणात वाया गेलं की, पुढे माझं हृदयाचे स्पंदन होण्यासाठी रक्त उरलं नव्हतं आणि हृदय बंद पडलं होतं. शिवाय मेंदूला ऑक्सिजन पोहचत नव्हता, त्यामुळे ब्रेनस्ट्रोक सुद्धा झाला होता.

डॉक्टरांना माझं हृदय पुन्हा सुरू करण्यासाठी ७ मिनिटांचा कालावधी लागला. या घटनेत मी २ दिवस बेशुद्ध होतो. नंतर शुद्धीवर आल्यावर माझ्याबरबोर काय घडलं ते मला आठवत नव्हतं. मात्र माझं हृदय बंद झालं तेव्हा मला काही गोष्टी जाणवल्याचं त्यांनी म्हटलंय.

मला तीन अंडाकार होल दिसले. यातील पहिल्या होलात हिरवळ आणि डोंगर दरी होत्या. त्या काहीवेळाने पुसट झाल्या आणि दुसऱ्या होलात मला आग गिसली.यामद्ये लोखंडं वितळवलं जात होतं. लोखंड वितळत असताना मला त्याचा स्मेल देखील येत होता. तर तिसऱ्या होलात सुंदर ढग आणि आकाशातील तारे दिसत होते, असं या व्यक्तीने लिहिलं आहे.

पुढे त्याने असं का दिसलं याचं कारणही सांगितलं आहे. हा व्यक्ती स्वत: एक ज्योतिष आहे. तो ग्रह तारे पाहून कुंडली काढतो. ग्रहांचा आणि ताऱ्यांचा आकार सुद्धा असाच असतो. त्यामुळे त्याला या गोष्टी दिसल्या असाव्यात, असं त्याने म्हटलं आहे. हाी आश्चर्यकारक पोस्ट आणि हा किस्सा आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card KYC: मोठी बातमी! महाराष्ट्रातील तब्बल १,५०,००० रेशन कॉर्ड बंद, मिळणार नाही धान्य; तुमचंही नाव आहे का?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT