viral news Saam TV
देश विदेश

Bhilwara News : 'घरी कुणीच नाही, भेटायला ये...' विवाहित प्रेयसीला रात्री भेटायला गेलेल्या तरुणासोबत असं काही घडलं की...

Viral News : राजस्थानच्या भिलवाडामधील ही घटना आहे.

साम टिव्ही ब्युरो

Crime News : विवाहित प्रेयसीला रात्री तिच्या घरी भेटायला जाणं एक तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. महिलेच्या घरच्यांनी तरुणांचा चांगलाच चोप दिला आहे. राजस्थानच्या भिलवाडामधील ही घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जहजपूर भागात राहणाऱ्या एका तरुणाची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याच परिसरातील राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

त्यानंतर दोघेही फोनवर बोलू लागले. विवाहित महिलेने तरुणाला मी विवाहित असल्याचं सांगितलं. पण मी पतीसोबत राहत नसल्याचंही सांगितलं. माझ नवरा कुठेतरी निघून गेला तो परत आला नाही. आता मी सासरच्या घरी राहते, असं महिलेने तरुणाला सांगितलं.

दोघांमध्ये रोज संभाषण सुरु असताना दोन दिवसांपूर्वी महिनेले तरुणाला फोन केला आणि घरी कुणी नसल्याचं सांगत भेटायला बोलवलं. जवळच राहणारा प्रियकर तातडीने तिच्या पोहोचला. घरी गेल्यानंतर दोघेजण गप्पांमध्ये मग्न होते. तेवढ्यात तिच्या सासरचे लोक तिथे पोहोचले. त्याठिकाणी महिला आणि तरुण रंगे हात सापडल्याने तरुणाचे हात-पाय बांधून त्याला बेदम चोप दिला. (Latest Marathi News)

दोघांना समोर बसवण्यात आले त्यावेळी प्रियकराने सांगितले की, त्याला महिलेसोबत राहायचे आहे आणि तो तिला खुश ठेवेल. सासरच्या लोकांनी दोघांनाही प्रियकराच्या गावी नेले आणि तेथे पंचायत झाली. (Viral Video) 

पंचायतीतही प्रियकराने सांगितले की, त्याला त्याच्या विवाहित प्रेयसीसोबत राहायचे आहे आणि तिला आनंदी ठेवणार आहे. याबाबत प्रेयसीला विचारले असता तिनेही तिला प्रियकरसोबत जायचे असल्याचे सांगितले.

पंचायतीने दोघांनी एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे. प्रियकर-प्रेयसी आणि पंचायत यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Padwa Gift For Wife: दिवाळी पाडव्यानिमित्त बायकोसाठी खरेदी करा लेटेस्ट डिझाईन्सच्या साड्या, 5 न्यू पॅटर्न्स

Gold vs Silver Investment: सोने की चांदी? १ लाखांच्या गुंतवणुकीवर कोण बनलं पैशांचं मशीन? आकडे पाहून बसेल धक्का

KDMC : स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडल्या; ठाकरे गटाचे महापालिका मुख्यालयासमोर ढोलताशा आंदोलन

Bathroom Hygiene: बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवावा की बंद? तुमची 1 सवय पडू शकते महागात, वाचा नेमकं काय घडतं?

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या कळंब तालुक्यात भूकंपाचा धक्का; एकलासपूरमध्ये 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

SCROLL FOR NEXT