Manasvi Choudhary
दिवाळी पाडवा म्हणजे पती- पत्नीच्या नात्यातील प्रेम, सन्मान आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते, आणि पती पत्नीला सुंदर भेटवस्तू देतात.
तुम्हालाही पत्नीसाठी गिफ्ट घ्यायचे असेल तर साडी घेऊ शकता. महिलांना साड्या फार आवडतात.
तुम्हालाही नवीन साडी घ्यायची असेल तर लेटेस्ट ५ ट्रेडिंग डिझाईन्स निवडा.
महिलांना पैठणी साडी फारच आवडते. तुम्हालाही पत्नीसाठी पैठणी साडी घ्यायची असेल तर तुम्ही मोर-पोपट,नारळी काठ आणि समृद्ध जरीचा पदर असलेली पैठणी साडी दिवाळी निवडा. या साडीमध्ये अनेक रंग आहेत.
ज्यांना खूप जड किंवा हेवी साड्या नेसायला आवडत नाहीत, त्यांच्यासाठी 'महेश्वरी साडी' बेस्ट आहे. महेश्वरी कापड वजनाने हलके, मऊ आणि अतिशय एलिगंट असते.
महाराष्ट्रीयन परंपरेत हिरवा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. गडद हिरव्या रंगाची साडी तुम्ही भेट म्हणून देऊ शकता.
सध्या फॅशनमध्ये डिजिटल प्रिंटेड, फ्लोरल प्रिंटेड आणि शिमरिंग टिशू साड्यांची खूप मोठी क्रेझ आहे. हलक्या फॅब्रिकवर सुंदर फुलांचे प्रिंट्स असलेल्या या साड्या घालण्यास अतिशय सोप्या असतात आणि मॉडर्न लूक देतात.
जर तुमच्या पत्नीला हटकेे साडी द्यायची असेल तर तुम्ही नेटची साडी निवडा. महिलांना नेटच्या साड्या आवडतात. तर एम्ब्रॉयडरी, सिक्विन किंवा धाग्यांचे काम असलेली नेट डिझायनर साडी बेस्ट असेल.