Crime News Saam TV
देश विदेश

शिक्षिकेनं विद्यार्थ्याशी ठेवले संबंध; टीचर ऑफ द ईअर ठरलेल्या महिलेला अटक

सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार मिळालेल्या एका महिला शिक्षिकेने अल्पवयीन मुलासोबत शाररिक संबंध ठेवल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार मिळालेल्या एका महिला शिक्षिकेने अल्पवयीन मुलासोबत शाररिक संबंध ठेवल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सदर आरोपी महिला शिक्षिकेला (Teacher) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही शिक्षिका मुलांना शारीरिक शिक्षणाचे धडे देत होती.

पोलिसांनी अल्पवयीन मुलासोबत शाररिक संबंध ठेवल्याप्रकरणी अटक केलेल्या महिला शिक्षिकेच नाव लेह (४३) असं असून ती अमेरिकेतील जेन्ट्री इंटरमीडिएट स्कूल मध्ये कार्यरत असून ती जवळपास २० वर्षांपासून याच शाळेत मुलांना शिकवत होती. शिवाय या महिलेला वर्षातील सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कारही (Best Teacher Award) देण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ -

पोलिसांनी लीहला १५ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. अल्पवयीन मुलांशी संबंध ठेवण्याबरोबर तिच्यावर अवैध पदार्थांचे सेवन केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाध्ये सुमारे ४० लाख रुपये भरल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी तिची जामिनावर सुटका करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेहला जवळपास १२ वर्ष पुर्वीच्या एका घटनेवरून ताब्यात घेण्यात आलं होतं. तिने त्यावेळी एका १७ वर्षीय विद्यार्थ्यासोबत संबंध होते. मात्र, हे प्रकरण आता उघडकीस आलं आहे. पीडित विद्यार्थ्याच्या आरोपावरून पोलिसांनी बरेच पुरावे गोळा केले. शिवाय पोलिसांनी विद्यार्थ्याचे पालक, लीहचा माजी पती आणि माजी शिक्षक यांच्याकडून हे पुरावे गोळा केले असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

लेहवर विद्यार्थ्यांना घरी बोलावणं आणि त्यांच्याशी शाररिक संबंध ठेवण्याचा आरोप करण्यात आला असून तिने शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना लक्ष केलं असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी इतर पीडितांनाही या प्रकरणात पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.

जेन्ट्री पब्लिक स्कूलचे अधीक्षक टेरी डेपोआला यांनी सांगितले की, आरोपी शिक्षेकेला तिच्या नोकरीवरून निलंबित करण्यात आलं आहे.लेह ही २० वर्षांहून अधिक काळ जेन्ट्री स्कूलमध्ये शिकवत होती. शिवाय २०१४-१५ मध्ये लेहला सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कारही मिळाला असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Maharashtra Election : नागपुरात घबाड सापडले, पोलिसांनी तब्बल दीड कोटी जप्त केले

Mhada Lottery: सर्वसामान्यांना दिलासा! म्हाडाच्या ६२९४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ; १० डिसेंबरपर्यंत करु शकता अर्ज

Viral Video: बापरे! ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् स्कूल व्हॅन उलटली; धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हायरल

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: 'रूह बाबा'नं केलं 'सिंघम'ला धोबीपछाड, 13व्या दिवशी किती कमाई?

SCROLL FOR NEXT