Physical Relation : एकदा का प्रेम जडले की, त्याबद्दल घडणारी कुठलीही गोष्ट कुतुहल वाटते. या वयात प्रेम असते की, आकर्षण हे आपल्याला कळत नाही. न कळत जडलेल्या या प्रेमात आपण अधिक वाहवत जातो.
पहिल्यांदा शरीर संबंध ठेवण्यात जितकी जास्त उत्सुकता वाटते तितकीच चिंता देखील. केवळ मुलीच नाही तर मुले देखील शरीर संबंध ठेवताना अधिक वेळा घाबरतात. शरीर संबंध ठेवताना नेमके त्यावेळी शरीराची काळजी कशी घ्यावी हे देखील त्यांना कळत नाही. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांच्याकडून अनेक चुका देखील होतात.
भारतासारख्या देशात शरीर संबंधाविषयी उघडपणे बोलण्यासाठी अनेकांना संकोच वाटतो. इतर अनेक सोशल साइट्सला याविषयी अनेकदा सर्च केले जाते परंतु, याविषयी तरुण वयातील मुलांना काही कळण्याचा मार्ग नसतो. त्यासाठी शरीर संबंध पहिल्यांदा ठेवल्यानंतर काय काळजी (Care) घ्याल हे जाणून घेऊया.
१. शरीर संबंध ठेवताना योग्य वेळ पहा. हे करण्यासाठी दोघांकडे ही पुरेसा वेळ असणे गरजेचे आहे. घाईघाईने शरीर संबंध ठेवल्यास नात्यात पुढे जाऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच योग्य जागा देखील निवडायला हवी.
२. पहिल्यांदा शरीर संबंध ठेवताना बरेच जोडीदार (Partner) कंडोमचा वापर करत नाही. अशावेळी आपल्याला शरीराची स्वच्छता देखील राखणे गरजेचे आहे. चांगल्या शरीर संबंधाचा आनंद घ्यायचा असेल तर पूर्वनियोजन करणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची लिंग वर्धक औषधे घेण्यास विसरू नका. याशिवाय कपड्यांबाबत कोणतीही चूक करू नका.
३. पहिल्यांदा शरीर संबंध ठेवताना अनेकदा जोडीदाराला संकोच वाटतो. त्यासाठी बळजबरी करु नका. त्यासाठी जोडीदाराशी प्रेमाने व समजेल अशा भाषेत संवाद साधा. अशावेळी गर्दी देखील टाळा, स्वत:वर नियंत्रण ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.