Viral Video Shows Full-Fledged Fight in Delhi Metro Coach Saam
देश विदेश

ढिशूम -ढिशूम! २ तरूणांमध्ये मेट्रोत तुफान हाणामारी, कुणी नाक फोडलं, कुणी केस ओढले..VIDEO व्हायरल

Viral Video Shows Full-Fledged Fight in Delhi Metro Coach: दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांमध्ये किरकोळ वाद शारीरिक हाणामारीत रूपांतरित झाला. व्हिडिओ व्हायरल. नेटकऱ्यांकडून ट्रोल.

Bhagyashree Kamble

  • दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल.

  • दोन लोकांमध्ये तुफान हाणामारी.

  • व्हिडिओ व्हायरल.

दिल्ली मेट्रो अनेकदा कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी रोमॅण्टिक कपलचे व्हिडिओ, तर कधी मेट्रोमधील रिल व्हायरल होतात. दिल्ली मेट्रो बऱ्याचदा मारामारीमुळे चर्चेत असते. दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिल्ली मेट्रोतील मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन लोक भांडताना दिसत आहे. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मेट्रोमध्ये बरेच लोक बसले आहेत. तर, काही जण उभे आहेत. दरम्यान, मेट्रो कोचमध्ये २ जणांमध्ये बाचाबाची होते. किरकोळ वादाचे रूपांतर काही क्षणात हाणामारीला सुरूवात होते. जवळ बसलेले लोक हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरूच राहते.

तर, काही जण भांडणाचा व्हिडिओ शूट करतात. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रोमधील भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर i.am.2507 या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करून व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्यानं लिहिले की, 'दिल्ली मेट्रो आता वाहतूक सुविधा राहिलेली नाही. ती एक मनोरंजन क्षेत्र बनली आहे'. 'मेट्रोमध्ये आता तिकीटांसह बॉक्सिंग ग्लोव्हज देखील द्यावे', अशी विनोदी टिप्पणी एका नेटकऱ्यानं केली. दरम्यान, काही वापरकर्त्यांनी या घटनेला लज्जास्पद म्हटलं आहे. अशा घटनेमुळे दिल्ली मेट्रोचं नाव खराब होतं, असं नेटकऱ्यानं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचा पराभव निश्चित, निवडणुकीआधीच भाजप नेत्याची भविष्यवाणी

Leftover Chapati Recipe : रात्रीच्या चपात्या उरल्या? सकाळी नाश्त्याला बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

EPFO News: पीएफचे पैसे काढण्यासाठी 12 महिने वाट पाहावी लागणार? जाणून घ्या नवीन नियम

Maharashtra Live News Update :झेंडू फुलांच्या दरात घसरण

ऐन दिवाळीत व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार, ५ कोटींची मागितली खंडणी; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT