Hubli violence News Updates, Violences in Hubli News Saam Tv
देश विदेश

हुबळीत दिल्लीसारखा हिंसाचार; पोलीस ठाण्यावर हल्ला, 12 जखमी; 40 जणांना अटक

कर्नाटकातील हुबळीमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवरून जमावाने पोलिस स्टेशनवर हल्ला

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: कर्नाटकातील हुबळीमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवरून जमावाने पोलिस स्टेशनवर हल्ला केला. यावेळी लोकांनी पोलीस (Police) कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यासोबतच रुग्णालय (Hospital) आणि मंदिरावर हल्ला केला आहे. कर्नाटकचे (Karnataka) गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी हुबली हिंसाचाराला ‘नियोजित कट’ करण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले आहे. (Violence like Hubli in Delhi Attack police station)

हे देखील पहा-

कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले की, हा पूर्वनियोजित हल्ला होता. हुबळीमध्ये (Hubli) देवरा जीवनहल्ली आणि कडूगोंडहल्ली सारख्या घटना घडवून आणायच्या होत्या. त्याचवेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री (CM) बोमई यांनी हा अक्षम्य गुन्हा असल्याचे म्हटले आहे. हुबळीमध्ये निर्माण झालेल्या जातीय तणावावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार ते सहन करणार नाही. रविवारी येथे भाजप (BJP) प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी बोम्मई पत्रकारांशी बोलत होते. (Hubli violence News Updates)

बोम्मई यांनी म्हणाले आहे की, 'पोलिस (Police) आधीच कारवाई करत आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास पोलीस मागेपुढे पाहणार नाहीत. त्यासाठी चिथावणी देणाऱ्यांवरही कारवाई करू. याला राजकीय रंग देऊ नये. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून याकडे पाहिले पाहिजे. तरच अशा घटना थांबतील.

कोणालाही सोडणार नाही- पोलीस

पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीचा धर्म कोणताही असो, हिंसाचारात सहभागी होण्यासाठी कोणालाही सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते म्हणाले की, सुरुवातीला सुनियोजित षडयंत्र म्हणून याकडे पाहिले जात आहे. या घटनेत 12 पोलीस जखमी झाले आहेत. एका तरुणाने व्हॉट्सअॅपवर वादग्रस्त पोस्ट (Post) शेअर केल्याने हिंसाचार सुरू झाला. सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. याप्रकरणी पोस्ट शेअर करणाऱ्या आरोपींसह ४० जणांना अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT