बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

Women Protecting School Children From Leopard Attacks: चंद्रपुरात वन्यप्राण्यांपासून शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी काही रणरागिणींनी कंबर कसलीय.... त्यामुळे मुलांच्या सुरक्षेसाठी वनविभाग आणि महिलांच्या धाडसी निर्णयातून कसे प्रयत्न होतायत..
Brave women from Sitaram Peth escort schoolchildren through forest routes amid wildlife threats in Chandrapur.
Brave women from Sitaram Peth escort schoolchildren through forest routes amid wildlife threats in Chandrapur.Saam Tv
Published On

महिन्याभरापूर्वी खेड तालुक्यात मुलासाठी बिबट्याशी भिडणाऱ्या आईची कहाणी तुम्ही ऐकली असेलच.. अशातच तांडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सीताराम पेठमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी काही रणरागिनींनी जीवाची पर्वा न करता धाडसी निर्णय घेतलाय... वन्यजीवांचा वावर असलेल्या अरण्यवाटेवरून शाळेत जाणाऱ्या मुलांचं रक्षण करण्यासाठी सीताराम पेठमधल्या वेणू रंदये, किरण गेडाम, सीमा मडावी आणि रीना नाट यांनी मोठं शिवधनुष्य हाती घेतलयं..

ताडोबाच्या सीमेलगत जंगलात वसलेल्या गावात मुलांना चौथीनंतरच्या शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जावं लागतं... मात्र त्यासाठी गावातून मुख्य रस्त्यावर यायचे म्हणजे वन्यप्राण्यांची दहशत असते...

अशातच शाळेतून परतताना अंधार पडत असल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता... त्यामुळेच गावातल्या काही महिलांनी मुलांसोबत मुख्य रस्त्यापर्यंत जाण्याचा आणि रात्रीच्या अंधारात मुलांना पुन्हा गावात घेऊन येण्याची जबाबदारी स्विकारली...- दोन महिन्यापूर्वी सुरु झालेल्या या महिलांच्या धाडसी उपक्रमाला वनविभागानं 'मातृशक्ती' असं नाव दिलंय. महिलांना प्रोत्साहनपर आर्थिक मदतीसह स्वसंरक्षणासाठी मदतीचं साहित्यही दिलंयं...

राज्यात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलांच्या मृत्यूच्या घटना वाढत असताना सीताराम पेठमधील महिलांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता... मुलांच्या रक्षणासाठी उचलेलं पाऊल नक्कीच कौतुकास्पद असं आहे... मात्र राज्यात ठिकठिकाणी निर्माण झालेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचं भय नेमकं कधी संपणार? हा खरा प्रश्न आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com