व्हिएतनाममधून एक मोठी बातमी हाती आलीय. शनिवारी व्हिएतनामच्या हालोंग खाडीत पर्यटकांनी भरलेली बोट उलटली असून यात किमान ३४ जणांचा मृत्यू झाला. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडलीय. सरकारी माध्यमांनुसार बोटीत एकूण ५३ लोक होते.
दक्षिण चीन समुद्रातून 'विफा' वादळ आलंय हे वादळ व्हिएतनामकडे सरकत असताना बोट वादळात अडकली. वादळाच्या तडाख्याने बोट समुद्रात उलटली. ही दुर्घेटना दुपारी २ वाजता (स्थानिक वेळेनुसार) घडली. वादळ चालू असताना जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि वीज कडकडाट होत्या, बोट उलटल्याची घटना घडली तेव्हा वीज कोसळली असल्याचं सांगितलं जात आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, बहुतेक प्रवासी राजधानी हनोईचे होते. मदत आणि बचाव पथके अजूनही वाचलेल्यांचा शोध घेत आहेत. पर्यटकांच्या राष्ट्रीयत्वाची अद्याप अधिकृतपणे पुष्टी झालेली नसल्याचं स्थानिक वृत्तसंस्था VnExpress ने वृत्त दिलंय. दरम्यान व्हिएतनामच्या सरकारी वृत्तसंस्थेने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, बचाव पथकांनी आतापर्यंत ११ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. तर ३४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये आठ मुलांचा समावेश आहे.
राजधानी हनोईपासून सुमारे २०० किलोमीटर ईशान्येस असलेले हालोंग बे येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. येथे बोटी चालवणे खूप लोकप्रिय आहे. यावर्षी चीन समुद्रात विफा हे वादळ आलेय. या वर्षातील हे तिसरे वादळ आहे. हे वादळ पुढील आठवड्याच्या सुरुवातीला व्हिएतनामच्या उत्तर किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
वादळामुळे हवामान खराब झाले, याचा परिणाम हवाई प्रवासावरही झाला. नऊ उड्डाणे इतर विमानतळांकडे वळवावी लागली आणि तीन उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती नोई बाई विमानतळाकडून देण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.