Ratnagiri News: समुद्रात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; चार पर्यटकांचा बुडून मृत्यू

Tourist Drowned In Aare Ware Beach: रत्नागिरी शहरातील आरेवारे समुद्रात बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. आज संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
Ratnagiri News
Tourist Drowned In Aare Ware Beachsaam tv
Published On

रत्नागिरीतील आरे वारे समुद्रात चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झालाय. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आरे वारे समुद्रात बुडालेले चारही पर्यटक रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळालीय. बुडालेल्या चार पर्यटकांपैकी तीन पर्यटक महिला तर एक पुरुष असल्याचं सांगितलं जात आहे. हे चौघे पोहण्यासाठी समुद्रात गेले होते. (Four Tourists Drown At Aare Ware Beach In Ratnagiri)

मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप असल्याने समुद्रकिनारी पर्यटनासाठी पर्यटकांची वाढू लागलीय. आरे वारे समुद्रकिनारी शनिवार आणि रविवारी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ओसवाल नगर येथून चार पर्यटक आरे वारे येथे आले.

हे चौघे समुद्रात पोहोण्यासाठी गेले.पण पाण्यात बुडून या चौघांचा मृत्यू झालाय. समुद्रात उतरल्या नंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आला नाही आणि ते पाण्यात बुडाले. अवघ्या काही मिनिटांत चारही जण खोल समुद्रात बुडून मृत पावले.

Ratnagiri News
Pune : पुण्यात मद्यधुंद अवस्थेत महिलेचा राडा, नशेत नदीपात्रात उडी मारणार तेवढ्यात...

जुनेद बशीर काझी (30 ओसवाल नगर), जैनब जुनेद काझी (28 ओसवाल नगर) उजमा समशुद्दीन शेख (17 मुंबई मुंब्रा) उमेरा शमशुद्धीन शेख (16 मुंब्रा) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील आदेश कदम यांनी ग्रामीण पोलिस निरीक्षक यांना दिलीय.

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री बघते यांनी घटनास्थळाला भेट दिली. चारही पर्यटकांना स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान समुद्रकिनारे, गड किल्ले या ठिकाणी गेल्यानंतर पर्यटकांनी सतर्कता बाळगावी. पर्यटनस्थळी गेल्यानंतर सतर्कता न बाळगल्यानं दुर्घटना घडत असतात. त्यामध्ये अनेकांचे जीव जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com