Vidhan Sabha Election  Saam Digital
देश विदेश

Vidhan Sabha Election : विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका; 7 राज्यांमध्ये केवळ २ जागांवर विजय, INDIA आघाडीला किती मिळाल्या जागा?

7 State Vidhan Sabha Election : ७ राज्यामधील १३ विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. यात इंडिया आघाडीने १० जांगावर विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.

Sandeep Gawade

सात राज्यांमधील विधानसभा पोट निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. इंडिया (INDIA) आघाडीला मात्र मोठं यश मिळालं आहे. १३ पैकी १० जागांवर इंडिया आघाडीचा विजय झाला आहे. तर भाजपला केवळ २ जागा जिंकता आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील ४ ही जागांवर ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसने विजय मिळवला आहे. हिमाचल प्रदेश आणि मध्यप्रदेशमधील प्रत्येकी १ जागा भाजपला जिंकता आली आहे.

पोटनिवडणुकीत काँग्रेसने उत्तराखंड आणि हिमाचल या पर्वतीय राज्यांमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. तर बंगालमध्ये ममतांच्या पक्षाने क्लीन स्वीप केला आहे. मध्य प्रदेश आणि हिमाचलमध्ये भाजपने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. दुसरीकडे पंजाबमधील एक जागा आम आदमी पक्षाच्या पदरात पडली आहे.

मध्य प्रदेशातील अमरवाडा, बिहार- रुपौली, पंजाब -जालंधर पश्चिम, राणाघाट दक्षिण, रायगंज, बागडा, पश्चिम बंगाल-माणिकतला, हिमाचल -हमीरपूर, देहरा आणि नलगढ, उत्तराखंड - बद्रीनाथ आणि तामिळनाडूच्या मंगळूर आणि विक्रवंडी विधानसभा जागांवर 10 जुलै रोजी मतदान झालं होतं. पोटनिवडणुकीत काँग्रेसने 4, TMC 4, भाजप 2 आणि AAP, DMK आणि अपक्षांनी प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये ४ ही जागा जिंकत क्लीन स्वीप केला आहे. राणाघाट दक्षिणमधून टीएमसीच्या मुकुटमणी अधिकारी यांनी भाजपच्या मनोज कुमार यांचा पराभव केला आहे. रायगंजमधून टीएमसीच्या कृष्णा कल्याणी यांनी भाजपच्या मानसकुमार घोष यांचा, बागडामधून टीएमसीच्या मधुपर्णा ठाकूर यांनी भाजपच्या विनय कुमार बिस्वास यांचा पराभव केला आहे.

उत्तराखंडमध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक झाली होती, या दोन्ही जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे काझी निजामुद्दीन यांनी मंगळुरू विधानसभा जागेवर भाजपचे उमेदवार करतार सिंह भडाना यांचा पराभव केला आहे. बद्रीनाथमध्ये काँग्रेसचे लखपतसिंग बुटोला यांनी भाजपचे उमेदवार राजेंद्रसिंह भंडारी यांचा ५०९५ मतांनी पराभव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण, आज पुन्हा होणार सुनावणी

Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहि‍णी अपात्र, सरकार वसूली करण्याची शक्यता

Accident: देवघरमध्ये भाविकांवर काळाचा घाला, बस-ट्रकची समोरासमोर धडक; १८ जणांचा मृत्यू

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी शिवभक्तांनी हनुमानाचीही करावी पुजा; हे उपाय करणं ठरेल फायदेशीर

Pune Tourism : ट्रेकिंग,सायकलिंग अन् पक्षी निरीक्षण; पुण्यातील विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT