केंद्रातील मोदी सरकारने 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून घोषित केला आहे. केंद्राने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. याच दिवशी म्हणजे 25 जून 1975 रोजी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने देशात आणीबाणी जाहीर केली होती. यातच मोदी सरकारने काँग्रेसला कोंडीत पकडत हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून, हुकूमशाही मानसिकतेचे प्रदर्शन करून आपल्या लोकशाहीचा गळा आवळला.
ते म्हणाले, लाखो लोकांना कोणतीही चूक न करता तुरुंगात टाकण्यात आले आणि प्रसारमाध्यमांचा आवाजही दाबण्यात आला. 1975 च्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या महान योगदानाच्या स्मरणार्थ भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान शहीद दिन' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
अमित शहा पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामागचा उद्देश हुकूमशाही सरकारच्या अगणित यातना आणि दडपशाहीचा सामना करूनही लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी लढलेल्या लाखो लोकांच्या लढ्याचा सन्मान करणे हा आहे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.