वृत्तसंस्था : सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या गोष्टी शेअर केले जातात. या माध्यमावर अशा काही गोष्टी असतात, ज्या तुम्हाला आनंद देऊन जात असतात. तर काही घटनांना बघून तुम्हाला दु:ख देखील होते. सोशल मीडियाच्या जोरावर एका रात्रीमध्ये स्टार झालेल्यांची संख्या देखील कमी नाही. यामध्ये रानू मंडल, बाबा का ढाबा, बाबा जॅक्सन अशी खूपच नावे घेता येणार आहेत.
हे देखील पहा-
सध्या मात्र, या नावांमध्ये गुजरातच्या आणखी एका मुलाचे नाव जोडावे लागेल. कारण हा मुलगा एका व्हिडीओमुळे संपूर्ण भारतात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ गुजरात राज्यातील अहमदाबाद मधील मणिनगर रेल्वे स्थानकाजवळचा आहे. या मुलाचे वय 14 वर्षे आहे. तो एका स्कुटीवरती कचोरी आणि समोसे विकत आहे.
आपल्या आई- वडिलांना मदत म्हणून, तो हे काम गेल्या अनेक दिवसांपासून करत आहे. याच मुलाचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याला मदत करण्याची विनंती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केली जात आहे. विशेष म्हणजे या छोट्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
लोक त्याच्या मदतीसाठी धावून गेले आहेत. लोक त्याच्या ठेल्यावर जाऊन दही कचोरी घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्याने तयार केलेली दही कचोरी खाण्यासाठी अक्षरश: लोकांची झुंबडच उडाली आहे. नेटकरी या मुलाला जमेल त्या पद्धतीने मदत करत आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.