Margaret Alva Saam Tv
देश विदेश

'युपीए'कडून उपराष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांनी केली 'या' नावाची घोषणा

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जुलै आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: मार्गारेट अल्वा (Margaret Alva) भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी 'युपीए'कडून उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जुलै आहे. एनडीएने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली आहे. शनिवारी सायंकाळी त्यांची उमेदवारी जाहीर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसनेते मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की, विरोधी आघाडीतील पक्षांसोबत यांच्यासोबत चर्चा करून माजी केंद्रीयमंत्री, माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचं नाव उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निश्चित केले आहे.

मार्गारेट अल्वा यांना विरोधी गटातील १७ पक्षांचा पाठिंबा असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै असून मतदान 6 ऑगस्टला होणार आहे.

राष्ट्रपतीपदासाठी भाजपने आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आङे. राष्ट्रपतीपदासाठी उद्या मतदान होणार आहे. ले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan: 'गौरी हिंदू नाही..., माझ्या कोणत्याही पत्नीने धर्मांतर केलं नाही', 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवर आमिर खानचं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट २ लाखांची कर्जमाफी - मुख्यमंत्री

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT