मुंबई : आंतरराष्ट्रीय मल्टी-स्पोर्ट्स इव्हेंट स्पर्धा म्हणून ख्याती असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन (Commonwealth Games 2022) प्रत्येक चार वर्षानंतर केले जाते. आता आगामी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी १९९८ मध्ये क्रिकेटचा सामना (Cricket Match) खेळवण्यात आला होता. मात्र, आता राष्ट्रकूल स्पर्धांमध्ये तब्बल २४ वर्षानंतर क्रिकेटचा सामना होणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटला (women's international cricket) संधी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच ७२ देशांमधील जवळपास ४५०० अॅथलीट मध्ये स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचे आयोजन बर्मिंघन येथे २८ जुलैपासून ८ ऑगस्टपर्यंत करण्यात आलं आहे.
या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये क्रिकेट गेम्सचा पहिला सामना २९ जुलैला होणार आहे. सर्व सामने एजबेस्टन स्टेडियम मध्ये खेळवण्यात येणार आहेत. क्रिकेटसाठी गोल्ड आणि ब्रॉन्ज मेडलचे सामने ७ ऑगस्टला खेळवण्यात येणार आहेत. राष्ट्रकूल स्पर्धा २०२२ साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणाही करण्यात आली आहे. दरम्यान, क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय संघ या स्पर्धेत पाकिस्तानच्या (India vs Pakistan) विरोधात सामना खेळणार आहे.
भारत आणि पाकिस्तान मध्ये होणारे सामने नेहमीच रोमांचक होतात, हे यापूर्वीचा इतिहास सांगतो. आताही भारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेटच्या सामन्यात रोमांच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची हा सामना पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्याम, टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली आहे.तर उप कर्णधार म्हणून सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना नेतृत्व करणार आहे.
आठ महिला संघांचं दोन गटात विभाजन
यावेळी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महिलांच्या आठ क्रिकेट संघांचा समावेश करण्यात आला आहे. या संघांचं विभाजन दोन गटात केलं आहे. या दोन्ही ग्रुपचे टॉप-२ संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करतील. त्यानंतर दोन संघांमध्ये गोल्ड मेडलसाठी अंतिम सामना खेळवला जाईल.
ग्रुप ए: भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बारबाडोस
ग्रुप बी: इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रीका, श्रीलंका
कॉमनवेल्थसाठी दोन्ही संघ
भारतीय महिला टीम : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मानधना (उप-कर्णधार), शेफाली वर्मा, एस. मेघना, तानिया भाटिया (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड़, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह , जेमिमाह रोड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल,स्नेह राणा.
स्टॅंडबाय : ऋचा घोष, पूनम यादव, सिमरन दिल बहादुर,
पाकिस्तान महिला टीम : बिस्माह मरूफ (कर्णधार), मुनीबा अली, अनम अमीन, ऐमान अनवर, डायना बेग, निदा डार, गुल फिरोजा,तुबा हसन, कायनात इम्तियाज, सादिया इकबाल, इरम जावेद, आयशा नसीम,आलिया रियाज,फातिमा सना, ओमॅमा सोहॅली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.