jagdeep dhankhar
jagdeep dhankhar  saam tv
देश विदेश

Jagdish Dhankhar|जगदीप धनखर देशाचे नवे उपराष्ट्रपती; जाणून घ्या त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास

Vishal Gangurde

नवी दिल्ली : देशाच्या नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी आज संसद भवनात मतदान पार पडले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे मतदान पार पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जगदीप धनखर आणि विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात लढत होती. या लढतीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) जगदीप धनखर विजयी झाले आहे. त्यामुळे जगदीप धनखर हे भारताचे १६ वे उपराष्ट्रपती ठरणार आहेत. जाणून घेऊयात नवे उपराष्ट्रपती जगदीश धनखर यांचा संपूर्ण राजकीय प्रवास.

कोण आहेत जगदीप धनखर ?

राजस्थानातील झुनझुनू जिल्ह्याच्या किठाना गावात त्यांचा जन्म झाला. बारावीनंतर पदार्थ विज्ञानामध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर राजस्थान विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला. धनखर हे आयआयटी, एनडीए आणि आयएएस परीक्षाही उत्तीर्ण आहेत.

राजस्थान उच्च न्यायालयाबरोबरच विविध राज्य आणि सर्वोच्च न्यायालयातही वकिली त्यांनी केली आहे. धनखर हे १९८९ ला जनता दलाच्या उमेदवारी पहिल्यांदा झुनझुनूचे खासदार होते. काँग्रेसमध्ये प्रवेश करून किशनगड येथून १९९३ मध्ये आमदार झाले. २००३ ला काँग्रेसशी फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला. ३० जुलै २००९ रोजी पश्चिम बंगालच्या (West Begnal) राज्यपालपदी निवड करण्यात आली.

दरम्यान, देशाच्या नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी संसद भवनात मतदान पार पडले. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जगदीप धनखर विजयी झाले आहेत. तर विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत जगदीप धनखर यांना ५२८ मतं मिळाली, तर मार्गारेट अल्वा यांना १८२ मतं मिळाली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जगदीप धनखर यांचा विजय झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत विजय झाल्याने जगदीप धनखर हे भारताचे नवे उपराष्ट्रपती होणार आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपल्यानंतर एक दिवस ११ ऑगस्ट रोजी पुढील उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: ताई तुम्ही रस्ता दिला, आता गाडीही द्या; महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला

PBKS vs CSK: पंजाबच्या शानदार गोलंदाजीवर जडेजाचा पलटवार! जिंकण्यासाठी ठेवलं १६८ धावांचं आव्हान

Mouni Roy : दिवसाला तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अभिनेत्री 'या' आजाराने होती त्रस्त

Uddhav Thackeray : गुजरातला विरोध कधीच नव्हता, पण... ; उद्धव ठाकरे अलिबागमधून भाजपवर कडाडले

Maharashtra Politics: '...म्हणून ते शपथविधीला आले होते', प्रफुल्ल पटेलांचं अमोल कोल्हेंबद्दल स्फोटक विधान

SCROLL FOR NEXT