Varanasi Accident News Saamtv
देश विदेश

Varanasi Accident News: रिलच्या नादात निष्पापाचा जीव गेला! डोक्यावर बाईक पडून तरुणाचा मृत्यू; १० दिवसांपूर्वी झाला साखरपुडा...

दुर्देवी बाब म्हणजे अपघाताचा बळी ठरलेल्या सर्वेशचा 1 जुलै रोजीच साखरपुडा झाला होता. या अपघाताने कुटूंबावर शोककळा पसरली आहे...

Gangappa Pujari

Varanasi Accident: सध्याच्या तरुणाईला लागलेले मोबाईल आणि रिलचे वेड चिंतेचा विषय ठरत आहे. रिलच्या नादात अनेकांनी जीव गमावल्याच्याही धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. वाराणसीमध्ये नुकताच असाच एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

वाराणसीमध्ये चालत्या बाईकवर बसून रिल बनवणे चांगलेच महागात पडले आहे. रिल बनवताना झालेल्या अपघातात एका निष्पाप तरुणाला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर रिल काढणारे पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी संध्याकाळी शिवपूरमधील गांजरी येथील उड्डाणपुलावर एक जोडपे रील शूट करत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी ते दोघेही दुचाकीवरून स्टंटबाजी करत व्हिडिओ काढत होते. मात्र याचवेळी त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती दुभाजकावर आदळली.

गाडीवरील दोघेही दुभाजकावर पडले मात्र त्यांची बाईक पुलाच्या दोन लेनमधील अंतरातून 30 फूट खाली पडली. याचवेळी पुलाखालून 25 वर्षीय अभियंता असलेला सर्वेश हा त्याच्या मित्रासह जात होता; ज्याच्या डोक्यावर ही गाडी पडली. डोक्याला गंभीर मार लागल्याने सर्वेशचा जागीच मृत्यू झाला. 

अपघातानंतर दोघेही रिल शूट करणारे तरुण- तरुणी पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून शिवपूर पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातानंतर सर्वेशचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र आणि प्रियकर हे गंभीर जखमी झाले आहेत. दुर्देवी बाब म्हणजे  अपघाताचा बळी ठरलेल्या सर्वेशचा 1 जुलै रोजीच साखरपुडा झाला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Alphonso Mango GI Tag Row: कोकणचा हापूस चोरण्याचा गुजरातचा डाव; 'हापूस'च्या जीआय मानांकनावरून वाद पेटला

'12 लाखांपर्यंतचा टॅक्स माफ केला, तुम्ही पगार वाढवला का?' पंतप्रधानांकडून उद्योगपतींची कानउघडणी

Saturday Horoscope: शनिवारी ग्रहांची मोठी कृपा! या राशींना मिळणार मेहनतीचे फळ, तर काहींना घ्यावी लागणार काळजी

10 लाख द्या तरच तक्रार मागे घेतो! स्पर्धा परीक्षा क्लास चालकांना खंडणीचा फोन; पुण्यात नेमकं काय घडलं?

अतिक्रमण वाचवण्यासाठी फोन केलात तर... थेट नावच फलकावर! पुणे आयुक्तांचा मास्टरस्ट्रोक

SCROLL FOR NEXT