Pune Fraud News: पुण्यातील धक्कादायक प्रकार! PMC मध्ये नोकरीचे आमिष दाखवत महिलांची फसवणूक; लाखो रुपयांचा घातला गंडा

या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलिस आशिष तावडे या आरोपीचा शोध घेत आहेत.
Pune Fraud News
Pune Fraud NewsSaamtv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Fraud News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील आर्थिक फसवणूकीचे अनेक गुन्हे समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत पुण्यातील तीन महिलांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

महानगरपालिकेत माझी बरीच ओळख आहे असे सांगत या तीन महिलांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले असून या प्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Pune Fraud News)

Pune Fraud News
Kirit Somaiya Viral Video Update : किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार?; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंचं पीडित महिलेला आवाहन

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबात समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही सिंहगड रोड (Singhgad) या ठिकाणी राहते. तरुणीची एका परिचितामार्फत आरोपी तावडेशी ओळख झाली होती. तावडेने तरुणीला पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. ज्याच्या जाळ्यात या तीनही महिला फसल्या.

तक्रारदार तरुणीकडून तिच्या मैत्रिणीकडून आणि आणखी एका महिलेकडून असे एकूण १५ लाख रुपये या भामट्याने उकळले. इतकंच काय तर विश्वास संपादन करण्यासाठी तावडे याने या महिलांना बनावट सर्टिफिकेट देखील तयार करून दिले होते. (Pune Latest News)

Pune Fraud News
Maharashtra Rain Update: राज्यात पुढचे ५ दिवस अतिमुसळधार पावसाचे, 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

त्या तरुणीने जेव्हा तावडेकडे पुढच्या गोष्टींसाठी विचारणा केली. मात्र त्याने उडवा उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. या संपूर्ण प्रकारानंतर महिलांना आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात आले. ज्यानंतर त्यांनी सिंहगड पोलिसांत धाव घेतली.

या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलिस आशिष तावडे या आरोपीचा शोध घेत आहेत. तसेच त्याने आणखी किती महिलांना फसवले आहे याचाही तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com