Vande Bharat train 100 kmph speed on Katra Banihal railway route saam tv
देश विदेश

1178 उंचावरून वंदे भारत ट्रेन करणार ढगांशी स्पर्धा; जगातील सर्वात उंच पुलावरून पहिल्यांदाच वाऱ्याच्या वेगानं धावणार

Vande Bharat Train 100 Kmph Speed Katra Banihal Chenab Bridge: कटरा-बनिहाल नव्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गावर आता गाड्या ताशी 100 किमी वेगाने धावणार. प्रवासाचा वेळ कमी होऊन जम्मू-काश्मीरमधील पर्यटन, व्यापार आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार.

Omkar Sonawane

माता वैष्णो देवो कटरा ते बनिहालदरम्यानच्या 111 किलोमीटर लांबीच्या नव्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गावर आता गाड्या ताशी 100 किलोमीटरच्या वेगाने धावू शकणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने या रेल्वेमार्गावरील गाड्यांचा वेग वाढवून 100 किमी प्रतितास करण्यास मंजूरी दिली आहे, त्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ कमी होणार असून जम्मू काश्मीरमधील रेल्वेच जाळ आणखी मजबूत होणार आहे. याआधी माता वैष्णो देवी कटरा-संगलदान रेल्वेमार्गावर गाड्यांची जास्तीत जास्त वेगाची मर्यादा ८५ किलोमीटर तर संगलदान-बनिहाल मार्गावर ताशी 75 किलोमीटर इतका होता. रेल्वे प्रशासनाने सर्व सुरक्षा आणि आवश्यक अटींचे पालन सुनिश्चित केल्यानंतर ट्रेनचा स्पीड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवासाचा वेळ कमी; पर्यटन आणि व्यापाराला चालना

जम्मूचे वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक उचित सिंघल यांनी सांगितले की, गाड्यांचा वेग वाढल्याने प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच जम्मू काश्मीरची होईल तसेच जम्मू काश्मीरची कनेक्टीव्हिटी अधिक मजबूत होईल. प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि अधिक आरामदायी रेल्वे सुविधा मिळेल. या रेल्वेच्या जाळ्यामुळे दोन्ही भागांमधील पर्यटन, व्यापार आणि आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य देत रेल्वे सातत्याने सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. कटरा-बनिहाल रेल्वेमार्गावरील स्पीड वाढल्याने या दोन्ही प्रमुख स्थानकांमधील प्रवास आता आणि जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

2025 मध्ये काश्मीरपर्यंत वंदे भारतचे स्वप्न साकार

काश्मीरपर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचे स्वप्न फेब्रुवारी 2025 मध्ये साकार झाले. जम्मू तवी ते श्रीनगरदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुमारे 269 किलोमीटरचे अंतर 4 तास 50 मिनिटांत पार करते. ही आधुनिक ट्रेन चिनाब पूल आणि अंजी खड्ड पुलासारख्या उंच आणि महत्त्वाच्या पुलांवरून धावते. वंदे भारत एक्स्प्रेस (26401) ही ट्रेन मंगळवार वगळता दररोज धावते. जम्मू तवी रेल्वे स्थानकावरून सकाळी 6.20 वाजता सुटून उधमपूर, श्री माता वैष्णो देवी कटरा, रियासी आणि बनिहाल मार्गे सकाळी 11.10 वाजता श्रीनगरला पोहोचते. तर वंदे भारत एक्स्प्रेस (26403) ही जम्मू तवीहून दुपारी 1.20 वाजता सुटते आणि सुमारे 4 तास 45 मिनिटांत श्रीनगरला पोहोचते.

किती आहे तिकीटदर?

वंदे भारत एक्स्प्रेस (26401): एसी चेअर कारचे भाडे 855 रुपये, तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे 1,585 रुपये आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस (26403): एसी चेअर कारचे भाडे 1,020 रुपये, तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे 1,780 रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापूरकरांना लवकरच मिळणार नवीन रेल्वे भुयारी मार्ग

Weather Alert: भारताचं टेन्शन वाढलं! देशावर येतंय १०० वर्षांतलं सर्वात मोठं संकट; हवामान तज्ज्ञांचा इशारा

Rahul Gandhi Today Live : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील नेत्यांकडून राहुल गांधी यांचे पुणे विमानतळावर स्वागत

Milk vs Curd: दूध की दही? रात्री झोपण्यापूर्वी कशाचे सेवन करावे, जाणून घ्या

Rakhi Muhurat 2026 : रक्षाबंधनाला राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती? ‘या’ 3 तासांत राहूकाळाचं सावट; जाणून घ्या शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT