Vande Bharat Train  Saam Tv
देश विदेश

Vande Bharat Train : एका दिवसात राम लल्लाचं दर्शन घेऊन परतणं शक्य; आजपासून अयोध्या-दिल्लीसाठी वंदे भारत ट्रेन सुरू

Vande Bharat Train Delhi to Ayodhya : आजपासून अयोध्या-दिल्लीसाठी वंदे भारत ट्रेन सुरू झालीय. ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस चालणार आहे. या ट्रेननं प्रवास करण्यासाठी किती भाडे द्यावे लागेल, ते जाणून घेवू या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vande Bharat Train Fare

सर्व राम भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून दिल्ली (Delhi) ते अयोध्या (Ayodhya) दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होत आहे. ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे. दिल्लीतील आनंद विहार येथून सकाळी 6.10 वाजता सुटणारी ही ट्रेन अवघ्या 8 तासांत आणि कमी थांब्यांमध्ये अयोध्येला पोहोचणार आहे. (vande bharat latest update)

अयोध्येत राम मंदिराची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारीला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे विमानांव्यतिरिक्त अयोध्येसाठी विशेष ट्रेनही चालवली जात आहे. वंदे भारत आज दिल्लीहून श्री रामजन्मभूमी मंदिर अयोध्येसाठी रवाना होत आहे.

बुधवारी ट्रेनच्या देखभाल दुरुस्तीचं काम

अयोध्या धाम जंक्शन-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेसला अप-डाऊनसाठी ट्रेन क्रमांक 22425 आणि 22426 नियुक्त केले आहेत. ही ट्रेन अयोध्या ते दिल्ली दरम्यान आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे. उत्तर रेल्वे- लखनौ विभागानुसार, आनंद विहार टर्मिनलवरून सकाळी 6.10 वाजता सुटेल आणि दुपारी 2.30 वाजता अयोध्येला पोहोचेल. त्याचवेळी बुधवारी ट्रेनच्या देखभाल दुरुस्तीचे काम केलं जाणार (vande bharat train) आहे.

दिल्ली ते अयोध्या अंतर कापण्यासाठी ट्रेनला 8 तास 20 मिनिटे लागतील. लखनौच्या कानपूर सेंट्रल आणि चारबाग रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबेल. गाडी दोन्ही स्थानकांवर 15 ते 20 मिनिटं थांबेल. ही ट्रेन कानपूर सेंट्रलला सकाळी 11 वाजता पोहोचेल, तर चारबाग रेल्वे स्थानकावर पोहोचण्याची वेळ दुपारी 12.25 वाजेची आहे.

परतीच्या वेळा

या वंदे भारत ट्रेनमुळे दिल्लीतील लोकांना एका दिवसात राम लल्लाचं दर्शन घेऊन परतणं शक्य होणार आहे. परतीची ट्रेन अयोध्या धाम जंक्शन येथून दुपारी 3.20 वाजता सुटेल. ही ट्रेन रात्री 11.40 वाजता आनंद विहार टर्मिनलला पोहोचेल. ही परतीची ट्रेन लखनौच्या चारबाग रेल्वे स्थानकावर संध्याकाळी 5.15 वाजता आणि कानपूरला 6.35 वाजता पोहोचेल.

भाडे किती असेल

वंदे भारत एक्स्प्रेसचे आनंद विहार टर्मिनल ते अयोध्येपर्यंत चेअर कारचे भाडे 1 हजार 625 रुपये आहे. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे 2 हजार 965 रुपये आहे. या ट्रेनच्या चेअर कारमध्ये तुम्हाला कानपूर सेंट्रल ते अयोध्या धाम प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला 835 रुपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT